वैजापूर शहरात तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त युवकांनी घेतली शपथ

वैजापूर ,१ जून  /प्रतिनिधी :- वैजापूर येथील पालिका वाचनालयात मंगळवारी (ता.31)  तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटो समोर युवकांनी तंबाखू सेवन न करण्याची शपथ घेतली. तालुका तंबाखू नियंत्रण समितीचे माजी अध्यक्ष धोंडीरामसिंह राजपूत यांनी उपस्थित युवक व वाचक वर्ग याना शपथ देऊन  तंबाखू सेवन व धूम्रपान इत्यादी मार्गाने तंबाखू सेवन करणाऱ्यास याचे दुष्परिणाम सांगून तंबाखू  सेवनापासून परावृत्त करण्याचे आवाहन केले तसेच जागतिक आरोग्य संघटनेचा तंबाखू सेवन न करण्याचा संदेश त्यांनी उपस्थितांना यावेळी दिला.
या प्रसंगी अध्यक्षस्थानी पालिकेचे सेवानिवृत्त अभियंता पी.के.तळेकर होते.  ग्रंथपाल एस. व्ही. राजपूत, ग्रामीण भागातील युवक संतोष त्रिभुवन, अमोल धिवर (बेलगाव), केशव क्षीरसागर, बबन क्षीरसागर, प्रवीण देशपांडे, मकरंद कुलकर्णी यांनी सहभाग नोंदविला.