विनायक व गंगापूर सहकारी साखर कारखाना भाड्याने देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू

जफर ए.खान 

वैजापूर ,१२ मे :- गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील विनायक सहकारी साखर कारखाना, गंगापूर सहकारी साखर कारखाना व फुलंब्री तालुक्यातील देवगिरी सहकारी साखर कारखाना हे तीन साखर कारखाने भाड्याने देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

देवगिरी कारखान्याच्या सर्वसाधारण बैठकीस आमदार गैरहजर; माजी चेअरमन काळे नाराज
देवगिरी सहकारी साखर कारखाना


कोट्यवधी रुपयांच्या थकीत कर्जापोटी राज्य सहकारी बँकेतर्फे वैजापूर तालुक्यातील विनायक सहकारी साखर कारखाना, गंगापूर साखर कारखाना व फुलंब्री तालुक्यातील देवगिरी सहकारी साखर कारखाना या तीन साखर कारखान्यांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. सेक्युरिटी कायदा 2002 नुसार जप्त केलेल्या या तीन सहकारी साखर कारखान्यांची मालमत्ता भाड्याने देण्यासाठी राज्य सहकारी बँक मुंबई तर्फे निविदा मागविण्यातआल्या आहेत. 19 मे 2022 रोजी निविदा फॉर्मची विक्री करण्यात येणार असून त्याचदिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. 20 मे 2022 रोजी निविदा उघडण्यात येणार आहेत.