वैजापूर पोलिस ठाण्यात इफ्तार पार्टीचे आयोजन

वैजापूर,३० एप्रिल  /प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील मुस्लिम  बांधवासाठी वैजापूर पोलिस स्टेशनतर्फे शनिवारी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

या इफ्तार पार्टीला आ. रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, नगरसेवक राजुसिंह राजपूत, गणेश खैरे, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, व्यापारी संघटनेचे काशीनाथ गायकवाड, पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे, पोलीस नाईक संजय घुगे, माजी नगरसेवक अकिल शेख, सय्यद हिकमतउल्ला, सदर काझी हाफीजोद्दीन, संजय बत्तीसे, अल्ताफ बाबा, विजय त्रिभुवन,धर्मेंद्र त्रिभुवन, संतोष त्रिभुवन, रवी पगारे, सुधीर लालसरे, वीज वितरणचे अभियंता जयवते, राजू चहावाले, ज्ञानेश्वर सिरसाट, प्रमोद निकाळे, रमेश त्रिभुवन यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते.