राज्य महिला आयोग आपल्या दारी:सुनावणीतून महिलांना न्याय

 कुटुंब केंद्रस्थानी मानून महिला आयोगाचे कार्य महिलांनी 155209 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवण्याचे आवाहन

58 अर्जावर सुनावणी पूर्ण 

Image

औरंगाबाद ,२६ एप्रिल  /प्रतिनिधी :- महिला न्याय, शिक्षण व प्रशिक्षणाच्या माध्यमातून आर्थिक स्वालंबनासाठी शासनाने काम करीत आहे. महिला व मुलांसाठी कुटुंबाचे हित लक्षात ठेऊन राज्य महिला आयोग काम करणार असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित  महिलांच्या तक्रारीवर सुनावणीच्या “राज्य महिला आयोग आपल्या दारी” या अंतर्गत सुनावणीच्या वेळी सांगितले.

Image

            या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस उपआयुक्त अपर्णा गिते, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी बी.एल.राठोड, जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण प्रसाद मिरकले, एकात्मिक बाल विकास अधिकारी गणेश पुंगळे, दामिनी पथकाच्या प्रमुख श्रीमती. निंभोरे, पोलीस निरीक्षक आम्रपाली तायडे व अर्चना पाटील यांच्यासह महिला बाल कल्याण विभागाचे सर्व अधिकारी, तसेच सुनावणीसाठी विविध तक्रारदार महिला उपस्थित होत्या.

Image

            कमी कालावधीत तक्रारदार महिलांवरील अन्याय दूर करुन वेळेत न्याय मिळवून देण्यासाठी तक्रारीवर समुपदेशनासाठी दोन वेळ पेक्षा जास्त वेळेस गैरहजर राहणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनास चाकणकर यांनी दिले. तसेच जिल्हा परिषद व महिला बाल कल्याण विभाग व इतर शासकीय विभागाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने पिडित अथवा अन्यायग्रस्त महिलांना सुधारगृह किंवा राजगृहात भरोसा सेल आश्रय देण्या बरोबरच कौशल्यधारित प्रशिक्षण व रोजगार उपलब्धतेसाठी व्यावसायिक प्रशिक्षणासह साहित्य, विविध योजनांच्या समन्वयातून उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आला.

Image

            राज्य महिला आयोगाने महाविद्यालयीन तरुणींसाठी छेडछाड, कौटुंबिक हिंसाचार अथवा अन्य तक्रारीसाठी राज्याने प्रथमच टोल फ्री क्रमांक सुरु केला असून 155209 या क्रमांकासह 1091 शहरी भागासाठी तर 112 ग्रामीण भागासाठी तक्रार दाखल करण्याबाबत अवाहन केले.

            राज्य महिला आपल्या दारी या कार्यक्रमात कौटुंबिक अन्यायाच्या तक्रारी वर सुनावणी घेतली असल्याचे सांगत कुटुंबव्यवस्था प्राधान्याने मानून काम करणार असल्याचेही यावेळी सांगितले. ‘भरोसा सेल’ औरंगाबादमध्ये चांगले काम करीत असून समुपदेशानातून तक्रारी सोडवून पती, पत्नीसह कुटुंबातील इतर नात्यातील सदस्याच्या तक्रारी सोडवण्याच्या सूचनाही संबधितांना करण्यात आल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी संरक्षण अधिकारी यांच्यासह ग्रामपंचयत सदस्य,लोकप्रतिनिधी, पोलीस, महिला बाल कल्याण, या सर्व घटकांनी एकत्र काम करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच ज्या कार्यक्षेत्रात बालविवाह होतील तेथील संबधित लोकप्रतिनिधीवर जबाबदारी निश्चीती करुन त्यांच्यावर देखील गुन्हे नोंदवण्यात येणार असल्याचे सांगितले. ‘मिशन वात्स्ल्य’ अंतर्गत कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबातील महिलेला मदत दिली जात असल्याचे यावेळी श्रीमती.चाकणकर यांनी सांगितले.