अर्जुनराव खोतकर प्रतिष्ठानतर्फे भोजन वाटप

जालना,२२ एप्रिल  /प्रतिनिधी :- जालना येथील अर्जुनराव खोतकर प्रतिष्ठानतर्फे सेवा उपक्रमांतर्गत  वतीने युवा नेते गौरव  नवगिरे यांच्या पुढाकाराने शुक्रवारी (ता.22) गांधी चमन येथील महिला व बाल रुग्णालयात  शिवसेना नेते,  माजी मंत्री अर्जुनराव  खोतकर  यांच्या हस्ते तीनशे गरजूंना मोफत भोजन  वाटप करण्यात आले. 

या वेळी  शिवसेना उपजिल्हाप्रमुख पंडितराव भुतेकर, युवासेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, अश्विन आंबेकर, अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख जावेद शेख, प्रशांतराव नवगिरे, संकेत  नवगिरे,अक्षय  जाधव, अनिरुद्ध झाल्टे, रवी खुपसे ,विनोद ठाणगे, अमित गायकवाड़,अमोल नाकोड,आकाश मांटे,शुभम शिंदे,योगेश त्रिभुवन,दिनेश गायकवाड़,सागर निसर्गन,आकाश पवार,अमोल वाळके यांच्या सह  शिवसैनिक उपस्थित होते.