ब्राह्मणाबाबत आक्षेपार्ह विधान ; वैजापूर येथे ब्राह्मण सभेतर्फे आमदार अमोल मिटकरी यांचा निषेध

वैजापूर,२२ एप्रिल  /प्रतिनिधी :-इस्लामपूर (जि.‌सांगली) येथे झालेल्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या सभेत कन्यादान या पवित्र विधीची खिल्ली उडवून पौराहित्य व ब्राह्मणांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आमदार अमोल मिटकरींचा येथील ब्राह्मण सभेतर्फे निषेध करण्यात आला.

ब्राह्मण समाज व सकल हिंदुंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ब्राह्मण सभेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी केली. भाजपाचे जिल्हा सरचिटणिस डॉ. दिनेश परदेशी, मर्चंट बॅकेचे अध्यक्ष विशाल संचेती यांच्यासह ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुधीर लालसरे, डॉ.‌एस.एम. जोशी, सचिव नागेश शिऊरकर, परशुराम उत्सव समितीचे अक्षय कुलकर्णी, संतोषी भालेराव यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदार किरण कुलकर्णी यांची भेट घेऊन निवेदन दिले. आमदार मिटकरी यांनी पौराहित्य व ब्राह्मणांची खिल्ली उडवून कन्यादान या विधीचा चुकीचा अर्थ सांगितला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी नगरसेवक स्वप्निल जेजुरकर, शैलेश चव्हाण, रोहित जोशी, राजु लालसरे, समीर कुलकर्णी, अरुण भालेकर, जितेंद्र कुलकर्णी यांच्यासह महिलांची यावेळी उपस्थिती होती.