वैजापूर न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 187 प्रकरणे निकाली ; 6 कोटी 35 लाख रुपयांची तडजोड

वैजापूर, ७ मे  /प्रतिनिधी :-वैजापूर तालुका विधिसेवा प्राधिकरण, वकील संघ वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वैजापूर न्यायालयात  आयोजित राष्ट्रीय लोक अदालतमध्ये शनिवारी 187 प्रकरणांत तडजोड होऊन 6 कोटी 35 लाख 6 हजार 921 रुपयांची वसुली करण्यात आली.


लोकन्यायालयाचे उदघाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.मोहीयोद्दिन शेख, सत्र न्यायाधीश पी.पी.मुळे, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय.जे.तांबोळी, एस.आर. शिंदे, एस. एस.निचळ, दिवाणी न्यायाधीश वरीष्ट स्तर श्रीमती प्रेरणा दांडेकर, श्रीमती पी.टी.शेजवळ (काळे) यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. 
या लोक अदालतमध्ये प्रलंबित 10 हजार 137 प्रकारणांपैकी 8 हजार 511 प्रकरणे तडजोडसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 187 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये एकूण 6 कोटी 35 लाख 6 हजार 921 रुपयांची तडजोड झाली. वकील संघाचे अध्यक्ष किरण ञिभुवन, उपाध्यक्ष व्ही.जी.वाघ, सचिव वैभव ढगे, कोषाध्यक्ष नितीन बोराडे तसेच वकील संघाचे सदस्य आर.पी.बोडखे, आर.एच.शिंदे, रविराज शिंदे, मझहर बेग, दत्तू जाधव, डी.बावचे, संतोष जेजूरकर, अमोल भुसारे, संजय बारसे,नवनाथ गायकवाड,इम्रान खान,एकनाथ कुंजीर ,कोठारी, अर्चना रोकडे, एस. एस. ठोळे, एस.पी.पवार,ए.सी. चव्हाण आदी उपस्थित होते.