सिल्व्हर ओकवरील हल्ला म्हणजे माझ्या आईवर हल्ला – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे

औरंगाबाद ,१८ एप्रिल  /प्रतिनिधी :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला झाल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. ‘सिल्व्हर ओकवर जे काही झाले तो माझ्या आईवर हल्ला होता’ असं मोठा खुलासा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सिल्व्हर ओकवरील हल्ला हा माझ्या आईवर झालेला हल्ला होता. माझ्या आईवर झालेला हल्ला म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रावर झालेला हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

आज औरंगाबाद दौऱ्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी सिल्व्हर ओकवरील हल्ल्या प्रकरणात पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली.’सिल्व्हर ओकवर जे काही झाले तो माझ्या आईवर हल्ला होता. मला हे आजही अतिशय प्रामाणिकपणे सांगायचं आहे. मी पोलिसांना संपर्क केला, त्यांना विनंती केली होती, जे कुणी हल्ला केला आहे, त्या महिलांशी मला बोलू द्या, त्यांना मला भेटायचं आहेय. त्यांचं नेमकं दु:ख काय आहे, हे मला समजून घ्यायचं आहे. महाराष्ट्रातील एक महिला म्हणून मला जाणून घ्यायचं आहे, असं ही सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंच्या भोंग्यावरील मुद्दावरही भाष्य केलं आहे. सुरुवातील त्या राज ठाकरे मनोरंजन करतात असं म्हणाल्या होत्या. पण नंतर पत्रकार परिषदेत ‘मी राज ठाकरे यांना मनोरंजन वगैरे बोलले नाही. मी असं काही बोललेलं मला आठवत नाही. आमच्या कुटुंबियांवर बोलणं ही मोठी बातमी असते, त्यामुळं लोक बोलतात ठीक आहे. राज ठाकरे आणि सभा मला त्यात जास्त काही बोलायचं नाही. प्रत्येक संघटनेला बोलायचा हक्क आहे आणि ते बोलतात. कुणाला कुठं जायचं आहे त्यांना तिथं जाऊ दे. सुप्रिया काहीच बोलत नाही. आमच्या तोंडात शब्द घालू नका, हाथ जोडून विनंती’ असंही यावेळी त्यांनी म्हटलं.

राज्य परिवहन महामंडळातील त्या महिलांना भेटून त्यांची वेदना समजून घ्यायची आहे. कारण अशा पद्धतीने वागणाऱ्या महिलांमध्ये ही मराठी संस्कृती कोठून आली, त्यांना समजून घ्यायचे आहे. कारण हल्ला ही कृती नक्कीच त्यांची नव्हती. त्यांना समजून घेणे सत्ताधारी म्हणून असणाऱ्यांची नैतिक जबाबदारी मानत असल्याचे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधू असे औरंगाबाद येथे सोमवारी सांगितले.  त्यांच्या मते १२० जणांचे प्राण गेले. त्यांची काही यादी आहे काय, कोण होते ते, याची माहिती घेऊन त्यांच्याशी बोलायला हवे. सरकारने केलेल्या आवाहनानंतर नऊ हजार जण कामावर रुजू झालेत. कारण चर्चेतूनच प्रश्न सोडविले जाऊ शकतात. त्यामुळे संवाद सुरू राहील, असेही त्या म्हणाल्या.

ईडीच्या रेड्सचा विक्रम झाला आहे. अनिल देशमुख यांच्यावर 103 धाडी टाकण्यात आल्या आहेत फक्त आरोप होत आहेत सिद्ध अजून काही होत नाही आणि पुढेही काही सिद्ध होणार नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

दिल्ली येथे घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्याचे परिणाम गुंतवणुकीवर होतील. आता कोठे गाडे रुळावर आले आहे. अशा स्थितीमध्ये असे अस्वस्थ करणारे वातावरण निर्माण होत असेल तर ते चुकीचे ठरेल. त्यामुळे देश व राज्यावर प्रेम करणारा कोणीही अशी भाषा वापरणार नाही. एकेकाळी कोणत्याही राजकीय प्रभाव न घेता स्वायत्ता संस्थाचा गैरवापर सुरू झाल्या असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर केंद्रीय तपास यंत्रणांनी तब्बल १०३ वेळा छापे टाकले. पण त्यांना काही मिळाले नाही. १०० कोटी रुपयांचा व्यवहार असल्याची चर्चा करण्यात आली. मग ती ५५ लाखापर्यंत आली. पुढे टंकलेखनातील चुका म्हणून ती रक्कम पाच लाख रुपयांपर्यंत खाली आली. नवाब मलिक व अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई पूर्णत: चुकीची असल्याचेही खासदार सुळे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. ‘जय श्रीराम’चा नारा वाढवत आता हनुमानही राजकीय व्यासपीठावर चर्चेचा विषय झाला आहे याकडे कसे पाहता हे असे विचारले असता खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या,‘ श्रद्धावान आहेच मी पण भारतीय संस्कृतीत गीता हे वर्तणुकीचे शिक्षण देते. पण सध्या धर्माचे सादर केले जाणारे दृश्यरूप भारतीय संस्कृती नाही.’ औरंगाबाद येथे नवउद्योजकतेच्या संकल्पनांवर काम करणाऱ्या औद्योगिक संघटनेबरोबरही त्यांची चर्चा केली. तसेच पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा केली.