खासदार सुप्रिया सुळे यांचा औरंगाबाद दौरा चित्ररूपात
औरंगाबाद ,१८ एप्रिल /प्रतिनिधी :- राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज औरंगाबादेत आदिवासी बांधवांसोबत नृत्य करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.खासदार सुप्रिया सुळे या आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.
शहरातील एमजीएम महाविद्यालयामध्ये एका कार्यक्रमात आदिवासी नृत्याचा कार्यक्रम आयोजित होता. या आदिवासी नृत्यात सहभाग घेऊन सुप्रिया सुळे यांनी ही ताल धरला.
ठाणे जिह्यातील जव्हार येथील आदिवासी बांधवांसोबत सुळे यांनी तारपा नृत्य केले. सुप्रिया यांनी आदिवासी नृत्यावर बराच वेळ ताल धरल्याने आदिवासी कलाकारांचा ही उत्साह वाढला आणि उपस्थितांनीही टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिला.
औरंगाबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते उल्हास उढाण यांचे नुकतेच निधन झाले. आज त्यांच्या पत्नी वर्षाताई उढाण यांची भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी किर्तीताई उढाण उपस्थित होत्या.औरंगाबाद येथील मौलाना आझाद शिक्षण संस्थेला भेट दिली. यावेळी संस्थेतील विविध महाविद्यालयातील प्राचार्यांशी संवाद साधला. याप्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, मौलाना आझाद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष फरहत जमाल आणि मौलाना आझाद शिक्षण संस्थेतील महाविद्यालयांचे प्राचार्य आदी उपस्थित होते.‘मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनी’च्या ठेवीदारांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी औरंगाबाद राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा अंकिता विधाते उपस्थित होत्या.औरंगाबाद दौऱ्यावर येथील शहर व ग्रामीण पक्षसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे,आमदार सतीश चव्हाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.औरंगाबाद येथील डीडीआरसी सेंटरला भेट देऊन पाहणी केली. या केंद्रात दिव्यांगासाठी करण्यात येणाऱ्या कामाची देखील माहिती जाणून घेतली.यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे,आमदार सतीश चव्हाण आदी उपस्थित होते.औरंगाबाद दौऱ्यावर असतानाचा हा एक सुखद अनुभव ठरला.यावेळी येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे जाऊन दर्शन देखील घेतले. याप्रसंगी सोबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार सतीश चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.औरंगाबादचे पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी स्वागत केले. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट घेतली. सीएमआयएच्या मॅजिक केंद्राला भेटपत्रकार अभिजीत हिरप यांच्या ‘हेल्दी सोसायटी’ या मासिकाच्या एप्रिल महिन्याच्या अंकाचे आज प्रकाशन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.युवा साहित्य आकादमी पुरस्कार विजेते लेखक प्रा. राहुल कोसंबी यांनी भेट घेऊन त्यांचे ‘उभं आडवं’ हे पुस्तक भेट दिले.प्रा.युसूफ बेन्नूर यांनी लिहिलेल्या ‘चंपारन मुव्हमेंट अँड सोशल अॅक्शन’ या पुस्तकाचे आज प्रकाशन केले. यावेळी अंकुशराव कदम, प्रा.प्रताप बोराडे,सचिन मुळे उपस्थित होते.यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई व यशस्विनी सामाजिक अभियानची आढावा बैठक आज औरंगाबाद येथे संपन्न झाली. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधला.राष्ट्रवादी काँग्रेसचे औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी शेळके कुटुंबीयांनी अतिशय आत्मीयतेने स्वागत केले.औरंगाबाद येथे सुनिता परभणे, शीतल परभणे, किशोर परभणे आणि कमलाताई गाढेकर यांची भेट झाली. कमलाताई या त्यांच्या गावच्या सरपंच आहेत. औरंगाबाद येथील एमजीएम विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘बाई माणूस’ या अभिनव पोर्टलच्या उद्घाटनास उपस्थित राहिले.
या संकेतस्थळावर आदिवासी, भटके विमुक्त, शेतकरी महिला, एलजीबीटीक्यू आदींबद्दल माहिती, लोककला, मुलाखती, ग्राऊंड रिपोर्ट, लेख, योजना आदींचीही माहिती असणार आहे. हा अतिशय महत्वाचा उपक्रम आहे. या वेळी महात्मा गांधी मिशन (एमजीएम) विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त प्रतापराव बोराडे, एमजीएम वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी, एमजीएम स्कुलच्या संचालक डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. रेखा शेळके, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत पवार आदी उपस्थित होते.यावेळी ‘बाई माणूस’च्या कार्यालयाचेही उद्घाटन केले तसेच ढोल वाजवून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी ‘बाईमाणूस’च्या पत्रकार शमिभा पाटील (मुंबई), किरण गीते (औरंगाबाद), रेणुका थोरात (अहमदनगर), निमा पटले (नंदूरबार), पूनम चौरे (डहाणू),भाग्यश्री लेखामी (गडचिरोली), रक्षा फुलझेले (चंद्रपूर), सुकेशनी नाईकवाडे (बीड) आणि दुर्गा गुडीलू (मुंबई) यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी जव्हार-मोखाडा येथील आदिवासी कलापथकाने पारंपरिक तारपा हे नृत्य सादर केले.