रोहिणी खडसे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदी ; तर बबन गित्ते यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई,२९ ऑगस्ट /प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारराष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील बड्या नेत्यांना सोबत घेत सत्तेत मंत्री पदाची शपथ घेतली. यानंर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर शरद पवार यांनी मैदानात उतरत राष्ट्रवादी पक्षाची नव्याने बांधणी करायला सुरुवात केली आहे. सुरुवातील नाशिक जिल्ह्यातील येवला या छगन भुजबळ यांच्या मतदार संघात सभा घेऊन शरद पवार यांनी बंडखोरांविरोधात रणशिंग फुंकलं. यानंतर बीड, कोल्हापूर याठिकाणी सभा घेत शरद पवार यांनी बंडखोरांना शिंगावर घेतलं.

आता शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी रोहिणी खडसे यांची नेमणूक करण्यात आली आहे. याआधी या पदावर राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण या होत्या. त्यांच्या जागी आता रोहिणी खडसे यांची वर्णी लागली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते रोहिणी खडसेंना नियुक्तीपत्र देण्यात आलं आहे.

तसंच बीडचे बबन गित्ते यांना देखील शरद पवार यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. गित्ते यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बबन गित्ते यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची साथ सोडून बीडच्या सभेत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार गट) प्रवेश केला होता. यानंतर त्यांना मोठी जबादारी देण्यात आली आहे.