वैजापूर शहरात भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी

वैजापूर,१४ एप्रिल  /प्रतिनिधी :- वैजापूर शहर त तालुक्यात भगवान महावीर जयंती विविध कार्यक्रमाने व उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक  काढून अभिवादन करण्यात आले. सकाळी आठ वाजता गांधी मैदान येथील भगवान महावीर स्तंभापासून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.

भगवान महावीरांचा जयघोष करीत निघालेल्या या मिरवणुकीत जैन समाजातील महिला, पुरुष व जैन शाळेचे विद्यार्थी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. या मिरवणुकीत आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाशसेठ बोथरा, सामाजिक कार्यकर्ते मेजर सुभाष संचेती, मर्चंट बँकेचे अध्यक्ष विशाल संचेती, राजेंद्र संचेती, अशोक कोठारी, निलेश पारख, राजेंद्र पारख, इंदरचंद बोथरा, डॉ.रविंद्र कोठारी, प्रफुल्ल संचेती, अनिल संचेती, हेमंत संचेती, नंदलाल मुगदीया, समाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत, महावीर बाफना आदी सहभागी झाले होते.

“जगा आणि जगू द्या”, भगवान महावीरांचा जय घोष करीत ही मिरवणूक मुख्य रस्त्यावरून पुन्हा भगवान महावीर स्तंभ येथे येऊन विसर्जित झाली. याप्रसंगी आ.रमेश पाटील बोरणारे, माजीनगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, माजी नगरसेवक शेख अकीलसेठ ,मर्चंट बँक चेअरमन विशाल संचेती, शोभाचंद संचेती, राजेंद्र पारख, नगरसेवक स्वप्नील जेजुरकर, ज्ञानेश्वर टेके, धोंडीरामसिंह राजपूत, निलेश पारख,डॉ.रवींद्र कोठारी, ज्ञानेश्वर सिरसाट, पारस घाटे आदींनी महावीर स्तंभ पूजन केले. पालिकेच्या भगवान महावीर रुग्णालयात  भगवान महावीरांची भव्य प्रतिमाभेट देण्यात आली. जयंतीदिनी जैन पाठशाळेत शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. रक्तदान शिबीर ही यावेळी घेण्यात आले.