वैजापूर तालुक्यातील बाभूळगावगंगा व लाखगंगा येथे विविध कामांचे लोकार्पण

वैजापूर,१९ एप्रिल  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील  बाभुळगावगंगा व लाखगंगा आमदार  रमेश पाटील बोरनारे यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा मंगळवारी (ता.19) पार पडला.

बाभुळगाव गंगा येथे दलित वस्ती समाज मंदीर बांधकाम (7 लक्ष रुपये) तसेच लाखगंगा येथे मारूती मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे (5 लक्ष रुपये) अशा एकूण 12 लक्ष रुपये निधीच्या कामांचे लोकार्पण आ.रमेश पाटील बोरणारे व माजी  नगराध्यक्ष साबेर खान यांच्या हस्ते झाले.या प्रसंगी पुज्य करुणा भंताजी, कैलासगिरी महाराज, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, उपतालुकाप्रमुख कल्याण पाटील जगताप, महेश पाटील बुणगे,विभागप्रमुख नानासाहेब पाटील थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी उपविभागप्रमुख बंडू पाटील गायकवाड, गोटुभाऊ राजपूत, विजय काळे, बाळासाहेब लकारे, संतोष घंगाळे, काकासाहेब गाढे, सोन्याबापू तुरकणे, सरपंच मनोज काळे, सचिन पडवळ, सुभाष अण्णा मोरे, अर्जून मोरे, संतोष गाढे, भगवान चौधरी, रावसाहेब गाढे, दिपक थोरे, लक्ष्मण काळे, ग्रामसेवक योगेश तांबे, एकनाथ खटाणे, विठ्ठल तूरकणे, सोपानराव पडवळ, दिगंबर तुरकने, दादासाहेब डोखे, दत्तु ठोंबरे, रावसाहेब आहेर, कैलास न्हावले, सुनिल पडवळ, प्रमोद तुरकने, राजेंद्र तुरकने, राधाकिसन  तुरकने, मुरलीधर तुरकने, नंदू तुरकने, प्रविण तुरकने, किसनराव तुरकने, मच्छिंद्र तुरकने, सोन्याबापू तुरकने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.