शिवराई येथे शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले यांच्या उपस्थितीत बैठक

वैजापूर,२३ मार्च  /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील शिवराई येथे आज शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत असून शिवसेना पक्ष संघटनेची बांधणी व गेल्या अडीच वर्षात शिवसेनेने केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम या कार्यकर्त्यानी करावे असे आवाहन श्री.वडले यांनी यावेळी बोलताना केले.

याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी,  शहरप्रमुख राजेंद्र साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी पाटील मिसाळ,युवासेना तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड, प्रदिप साळुंके, संभाजी पाटील डुकरे, प्रविण भाडाईत, राजूभाऊ राजपूत, भरत जगताप, प्रा राजेंद्र नवले, सरपंच संभाजी जगताप, अरुण मातेरे, विजय शेळके, सोमनाथ घोडके, नितीन कान्हे, आदीनाथ शेळके, दिपक लाड, सोमनाथ रोठे, मच्छिंद्र शेळके, गणेश धनाड, ओमप्रकाश सुराशे, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.