रघुपती राघव राजाराम काँग्रेस को सद बुद्धी दे भगवान,काँग्रेसविरोधात भाजपाचे आंदोलन

औरंगाबाद,९ जानेवारी / प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीच्या वतीने महात्मा गांधींना पुष्पहार घालून अभिवादन करून त्या नंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर बसून मूक पद्धतीने काँग्रेसविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाब मध्ये चाळीस हजार करोड रुपयाचे विकासात्मक कार्याचे उद्घाटन व लोकार्पण करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते, परंतु काँग्रेस शासित सरकार व नेते पंजाब मध्ये असल्यामुळे त्यांनी पंतप्रधानाच्या दौऱ्याच्या वेळी जाणीव पूर्वक त्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल, या प्रकारचे कृत्य केले, पंतप्रधान ज्यावेळेस हुसेनीवाला येथील शहीद स्मारकला अभिवादन करण्यासाठी जात होते, त्या वेळी जाणीवपूर्वक त्यांच्या रस्त्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते घुसवण्यात आले व त्यांचा रस्ता आडवून त्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल,अशा प्रकारचे कृत्य केले,नक्कीच या षडयंत्रामध्ये दिल्लीमधील काँग्रेसचे शीर्षस्थ नेते हे पडद्या आडून यामध्ये सहभागी असतील ,त्याशिवाय पंजाब मधील काँग्रेस सरकार हे देशाच्या पंतप्रधाचा जीव धोक्यात घालणार नाहीत, काँग्रेस आज जनते मधून नामशेष झालेली आहे, त्यांच्या दृष्टीने नरेंद्र मोदी हे त्यांचे कर्दनकाळ ठरले, त्यामुळे नरेंद्र मोदींच्या बाबतीत बरेवाईट करण्यासाठी, आज काँग्रेस व काँग्रेसचे नेते उतावळे झालेले आहेत, त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महात्मा गांधींना पुष्पहार घालून अभिवादन करून त्या नंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर बसून मूक पद्धतीने निषेध आंदोलन करण्यात आले,

या मुक आंदोलनावेळी कार्यकर्त्यांनी काळे रिबीन बांधुन,काळे मास्क परीधान करून,तसेच काळे कपडे घालून या आंदोलनामध्ये सहभाग घेतला व महात्मा गांधी यांच्या पुतळ्या पुढे बसून गांधीजींना विनंती केली, काँग्रेसच्या नेत्यांना सद्बुद्धी देवो व आपले पंतप्रधान हे सुरक्षित राहिले पाहिजेत या साठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने, शहरातील शहागंज ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष संजय केनेकर यांच्या नेतृत्वात मूक निदर्शने करण्यात आली.या मूक निदर्शनामध्ये,राजेश मेहता ,जगदीश सिद्ध, कचरू घोडके, लता दलाल, अमृता पालोदकर, डॉ. राम बुधवंत ,मुकुंद दामोदरे ,बालाजी मुंडे ,रामेश्वर भादवे, मंदीप राजपूत, योगेश वाणी, मनोज भारस्कर ,दीपक ढाकणे, बबन नरवडे,अमित लोखंडे, अरविंद डोणगावकर ,प्रशांत भदाणे, रामचंद्र नरोटे ,सिद्धार्थ साळवे, दीपक बनकर, संजय चौधरी ,सुनील जगताप, नितीन चित्ते, लता सरदार, शंतनु उरेकर, लक्ष्मण कुलकर्णी, धनंजय पालोदकर, शालिनी बुंदे, दिव्य मराठे, छाया खाजेकर,आदी पदाधिकारी उपस्थित होते,