माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना चौकशीची नोटीस, वैजापूर भाजपतर्फे नोटीसची प्रतिकात्मक होळी

वैजापूर,१३ मार्च  /प्रतिनिधी :-माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांना राज्य सरकारने नोटीस बजावून त्यांची चौकशी सुरू केल्याबद्दल वैजापूर तालुका भाजपतर्फे आज सकाळी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात नोटीसची प्रतिकात्मक होळी करून निषेध करून निदर्शने आंदोलन करण्यात आले. 

या निदर्शने आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव,भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, जिल्हा दूध संघाचे संचालक कचरू पाटील डिके, तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे, शहराध्यक्ष दिनेश राजपूत, डॉ. राजीव डोंगरे, बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर पाटील जगताप, भाजप अल्पसंख्याक आघाडीचे  नबी पटेल, उद्योग आघाडीचे कैलास पवार, नाना पाटील गुंजाळ, कारभारी पाटील कराळे, ज्ञानेश्वर इंगळे, महेश भालेराव, चंद्रशेखर साळुंके, राजेंद्र कुंदे, सतीश पाटील शिंदे, अनिल वाणी, संतोष मिसाळ, चांगदेव उघडे, उदय सोनवणे, नगरसेवक शैलेश चव्हाण, दशरथ बनकर, सुर्यकांत सोमवंशी, गणेश खैरे, मोहनराव आहेर, महेंद्र काटकर, गोकुळ भुजबळ, बजरंग मगर, अशोक गायकवाड, प्रतापसिंग महेर, बंटी मगर, गौरव दोडे, वसंत शेलार, राजू देशमुख, भाऊसाहेब झिंजुर्डे, विजय चव्हाण, आकाश शिंदे, अशोक पवार, केशव आंबेकर, सुरेश पाटणे, दीपक पवार, नदीम शेख, शिवा पवार जनार्दन जाधव, दिनेश थोरात, गौतम गायकवाड सुलतान पापाजी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.