इंडिया आघाडीने केली समन्वय समितीची स्थापना ; महाराष्ट्रातील शरद पवार व संजय राऊत या दोन नेत्यांचा समावेश

मुंबई  :-आज देशातल्या प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत तिसरी बैठक झाली . आज या बैठकीचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. सध्या ही बैठक सुरु असून या बैठकीत समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. या समन्वय समितीत १३ जणांचा समानेश करण्यात आला आहे. इंडिया आघाडीला पुढे नेण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच या बैठकीत महत्वाचे ठराव देखील मंजूर करण्यात आला आहे.

इंडिया आघाडीतील वरिष्ठ नेते समन्वय समितीच्या माहितीनुसार पुढील काम करणार आहे. या समितीचे सदस्य देशभर फिरणार असून पुढील अजेंडा ठरणार आहे. या समितीत महाराष्ट्रातून शरद पवार आणि संजय राऊत यांचा समावेश करण्यात आला आहे.

या समन्वय समितीत १३ जणांचा समावेश असणार आहे.

१) केसी वेणूगोपाल

२) शरद पवार

३) एम के स्टॅलिन

४) संजय राऊत

५) तेजस्वी यादव

६) अभिषेक बॅनर्जी

७) राघव चड्डा

८) जावेद खान

९) ललन सिंग

१०) हेमंत सोरेन

११) मेहबूबा मुफ्ती

१२) डी राजा

१३) ओमर अब्दुला

इंडिया आघाडीच्या या बैठकीत काही ठराव मंजूर करण्यात आले आहेत. यात ‘जुडेगा भारत, जितेगा भारत’, ‘शक्य तिथे लोकसभा निवडणुका एकत्र लढणार’, ‘जागावाटपसंदर्भात लवकरात लवकर सुरुवात करुन प्रक्रिया पूर्ण करणार’, ‘येत्या काही दिवसांत एकत्र रॅलीला सुरुवात करणार’ या ठरावांचा समावेश आहे. यासोबतचं इंडिया आघाडीत सोशल माध्यमांवर एकजूट दाखवणार असून त्यासाठी प्रवक्त्यांमध्ये समन्वयासाठी देखील एका विशेष समितीची स्थापना केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज मुंबईतील ग्रॅण्ड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये इंडिया आघाडीची ही बैठक पार पडत असून याबैठकीचा आज दुसरा दिवस आहे. या बैठकीत इंडिया आघाडीचा अध्यक्ष कोण असावा आणि पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून कुणाला प्रोजेक्ट करावं, यावर चर्चा पार पडत असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजप सूडबुद्धीने काम करत असून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. आपल्याला अटकेची तयारी करावी लागेल, असं वक्तव्य खरगे यांनी केलं आहे.

एकमत होत नसल्याने इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण बारगळले!

इंडिया आघाडीचा आज दुसरा दिवस आहे. या बैठकीसाठी २८ पक्षांचे ६३ नेते उपस्थित आहेत. मात्र त्या प्रत्येकाची वेगवेगळी मतमतांतरे असल्याने आणि त्यांच्यात एकमत होत नसल्याने इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आता या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये आघाडीतील प्रमुख पक्षांच्या ११ सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. मात्र तेथेही एकमत होत नसून कोणाची निवड करावी यावरुन त्यांच्यात जोरदार खळ सुरू आहे. या बैठकीत त्या त्या पक्षाचे प्रत्येकी एक प्रमुख नेता समितीचा सदस्य असेल आणि इंडिया आघाडीचे जे काही महत्त्वाचे निर्णय असतील ते या समितीमार्फत घेतले जातील, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. तसेच या आघाडीत काही पक्ष नव्याने आलेले आहेत त्यांनाही सहभागी करुन घेतले जाणार आहे. समिती स्थापन झाल्यानंतर त्या समितीत चर्चा होईल, त्यानंतरच लोगो फायनल केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तूर्तास आज तरी लोगोचे अनावरण होणार नाही.

आघाडीला संयोजकाची सध्या गरज नाही, उद्धव ठाकरेंचे विधान

विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीच्या दोन दिवसांच्या बैठकीनंतर शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आघाडीच्या संयोजकांबद्दल मोठे विधान केले आहे. ते म्हणाले सध्या आघाडीला संयोजकांची खास गरज नाही. आम्ही आपापसात सहमती करून १४ सदस्यांची कमिटी नियुक्त केली आहे.

या बैठकीत २०२३ची लोकसभा निवडणूक एनडीए विरुद्ध लढण्याचा संकल्प करण्यात आला आहे. दरम्यान, बैठकीत आघाडीच्या जागावाटपाबाबात कोणाचेही एकमत झाले नाही मात्र लवकरच राज्यातील जागा वाटपाची चर्चा सुर होईल. या दरम्यान आघाडीचे घोषवाक्य जुडेगा भारत, जीतेगा इंडिया हे जाहीर करण्यात आले.

इंडिया आघाडीच्या कॉर्डिनेशन कमिटी अँड इलेक्शन स्ट्रॅटेजी कमिटीशिवाय कँपेन कमिटीचीही निर्मितीही करण्यात आली. यात काँग्रेसचे गुरदीप सिंह सप्पल, जेडीयूचे संजय झा, आरजेडीचे संजय यादव, एसएसचे अनिल देसाई, एनसीपीचे पीसी चाको, जेएमएमचे चंपाई सोरेन, समाजवादी पक्षाचे किरणमय नंदा, आपचे संजय सिंह, सीपीआयएमचे अरूण कुमार, सीपीआयचे बिनॉय विश्वाम, नॅशनल कॉन्फरन्सचे जस्टिस हसनैन मसूदी, रालोदचे शाहीद सिद्दीकी, आरएसपीचे एमके प्रेमचंदन, एआयएफबीचे के जी देवराजन, सीपीआयएमएलचे रवी राय, वीसीकेचे तिरुमवलन, आययीएमएमएलचे केएल कामदर मोईदीन, केसीएमचे जोस के आणि टीएमसीच्या एका सदस्याचा समावेश आहे.

मुंबईत ३१ ऑगस्ट आणि एक सप्टेंबरला झालेल्या विरोधी पक्षांच्या आघाडीच्या बैठकीत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना म्हटले की जेव्हा मी लडाखला गेलो होतो तेव्हा मी स्वत: चीनच्या लोकांना तिथे पाहिले. लडाखच्या स्थानिक लोकांनी मला सांगितले की चीनबाबत पंतप्रधान मोदी खोटं बोलत आहेत. चीनने आमची जमीन ताब्यात घेतली आहे.