जालना-जळगाव रेल्वे मार्गाचा फायनल लोकेशन सर्वे:तीन सदस्यांची टीम जालन्यात

जालना,२३ मार्च /प्रतिनिधी :-भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत जालना-जळगाव रेल्वे मार्गाचा फायनल लोकेशन  सर्वेसाठी २५ मार्चपर्यंत मध्य रेल्वेच्या सर्वेक्षण विभाग मुंबई येथील मुख्य परिचालन अधिकारी श्रीमती व्ही.नलिनी, मुख्य यातायात अधिकारी रवीप्रकाश गुजराल व मुकेश लाल या तीन सदस्यांची टीम जालना-जळगाव रेल्वे मार्गाच्या फायनल सर्वेक्षणासाठी आली आहे.

8 फेब्रुवारी २०२२ रोजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी मंजुरी दिली असून, हा जालना-जळगाव 174 किलोमीटर लांबीचा मार्ग असणार आहे, यासाठी अंदाजे 4.5 कोटी रुपये फायनल लोकेशन सर्वे साठी मंजुर केले आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी तातडीने सर्वेक्षण व्हावे यासाठी संबंधित विभागाला सूचना केल्या. त्यानुसार तीन सदस्यांची टीम जालना-जळगाव रेल्वे मार्गाच्या फायनल सर्वेक्षणासाठी आली आहे.

सदर दौऱ्यात २४ मार्च रोजी श्री क्षेत्र राजूर गणपती, तहसील कार्यालय भोकरदन, कृषी उत्पन्न बाजार समिती भोकरदन, बस आगार सिल्लोड, तहसील कार्यालय सिल्लोड, कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड, अजिंठा व दि.२५ मार्च रोजी जळगाव जिल्ह्यात विविध कार्यालये, औद्योगिक वसाहतीला भेट देणार आहेत.