सामाजिक भान असणारे विद्यार्थी देश घडवू शकतात – मनीषा टोपे

जालना,२२ मार्च /प्रतिनिधी :-राष्ट्रीय सेवा योजनेच्या  विशेष शिबिराच्या माध्यमातून श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम होते. नकळत होणारे संस्कार शिबिरातून मिळतात. तसेच सामाजिक भान असणारे विद्यार्थिच देश घडवू शकतात असे प्रतिपादन अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उदघाटनप्रसंगी मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या सचिव सौ मनीषाताई टोपे यांनी केले. 

Displaying IMG-20220322-WA0038.jpg

   

अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे रा. से. यो. चे विशेष शिबिर कचरेवाडी ता जि जालना येथे दि 22 ते 28 मार्च 2022 दरम्यान होत आहे. याचे उदघाटन आज दि 22 मार्च  रोजी झाले. याप्रसंगी बोलताना मनीषाताई टोपे असे म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी शिबिराच्या माध्यमातून संस्काराची शिदोरी गोळा करण्याचे काम केले पाहिजे. आपल्यामुळे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होईल असे काम आपल्या हातून घडले पाहिजे की जेणे करुन नवसमाज निर्मितीसाठीची एक मोठी जबाबदारी पूर्ण झाली पाहिजे. गावाच्या सर्वांगीन विकासासाठी अंकुशराव टोपे महाविद्यालय नेहमीच अग्रेसर राहिल अशी ग्वाही त्यांनी दिली.     

Displaying IMG-20220322-WA0037.jpg

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दादासाहेब गजहंस प्रास्ताविक करताना असे नमूद केले की, दोन वर्षाच्या कोविड 19 च्या मोठया कालखंडानंतर परत एकदा महाविद्यालय पूर्वीसारखे नियमितपणे सुरु होत असताना रा. से. यो. च्या शिबिराला मोठया प्रमाणात विद्यार्थ्यांचा सहभाग मिळत असून या शिबिरातून नेतृत्व करण्याचे गुण आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे महत्वाचे कार्य विद्यार्थ्यांच्या हातून घडते, यातूनच सलोख्याचे संबंध जोपसले जातात.   

अध्यक्षीय समारोप प्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ बी आर गायकवाड म्हणाले की, चांगल्या संस्काराची देवाणघेवाण ही अशा शिबिरामधूनच होत असते. संस्कार हे अनुभवातून येतात आणि ह्याच संस्काराची पेरणी ही शिबिरातून होताना दिसते. तसेच उत्तम नागरिक घडविण्याचे काम महाविद्यालय सातत्याने करीत आहे. सकारात्मक विचार हे गुणकारी औषध आहे आणि ते जोपासण्याचे काम विद्यार्थ्यांनी करावे असे नमूद केले.      

या कार्यक्रमास लायन्स क्लबच्या मीनाक्षी दाड , जयश्री लड्डा उपस्थित होत्या. शिबिरातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावा म्हणून सामाजिक कार्यकर्त्या अनिता अग्रवाल यांनी टी शर्ट आणि कॅप भेट दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अविनाश भालेराव तर आभार डॉ सुरेंद्र पडगलवार यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ अन्सारी, डॉ सीमा निकाळजे यांनी प्रयत्न केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ संजय पाटील, उपप्राचार्य प्रा रमेश भुतेकर, प्राध्यापक, विद्यार्थी, सरपंच, गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.