जालना जिल्ह्यात 80 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह

जालना दि. 15 :- जालना शहरातील नाथबाबा गल्ली -1, कबाडीपुरा -1, मंगळबाजार -1, काद्राबाद-3 मस्तगड -1, रोहिला गल्ली-1, इतवारा मोहल्ला -1, बुंदेले चौक -1, सकलेचा नगर -1 ,झाशीची राणी चौक -1 अशा एकूण 12 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर संभाजीनगर -36, लक्कडकोट -6, मस्तगड- 5, पानीवेस -2, हिरखान रोड पानीवेस -2, नेहरु रोड -2, रुख्मिणीनगर -4, पोलास गल्ली – 3, पुष्पकनगर- 3, तट्टुपुरा – 1, आनंदी स्वामी गल्ली -1 नाला जालना – 1, खडकपुरा -1, मोदीखाना -1, संजयनगर -1, मित्तलनगर- 1, दु:खीनगर -1, गोकुळविहार -1, अंबर हॉटेल परिसर -1, कालीकुर्ती -1, लक्ष्मीनगर -1 बु-हाणनगर-1 निलम नगर -1, सत्यनारायण नगर चंदनझिरा -1, शंकर नगर -1, सिध्दीविनायक नगर -1, अशा एकुण 80 रुग्णांचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण– 5635 असुन सध्या रुग्णालयात – 327 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 2219, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–410 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-8660, एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने–80 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-1182 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -6486,रिजेक्टेड नमुने -35, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या – 421 एकुण प्रलंबित नमुने- 957,यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या – 1841.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–20, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती–1617 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -70, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -522, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -55, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 327,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 2, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-12, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-727, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-369 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-35, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-17192,तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 51 एवढी आहे.

जालना शहरातील मित्त लनगर परिसरातील रहिवासी असलेला 60 वर्षीय पुरुष रुग्णास श्वसनाचा, उच्च रक्तदाब, मधुमेह व न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 12 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 16 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झला. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच दि. 16 जुलै 2020 रोजी पहाटे 3.40 मिनिटांनी त्यांचा मृत्यु झाला तसेच जालना शहरातील दु:खीनगर परिसरातील रहिवासी असलेल्या 44 वर्षीय महिला रुग्णास श्वसनाचा व न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 12 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 16 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच दि. 14 जुलै 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाला.

लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस 181 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन -990 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 87 6 वाहने जप्त,आय. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड-99 हजार 600, मुददेमाल जप्त -26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 5 लाख 81 हजार 830 असा एकुण 7 लाख 8 हजार 238 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *