मुख्यमंत्री, उपमुख्यमंंत्री यांच्याकडे समस्त ब्राह्मण समाजाच्या मागण्या मांडणार -पालकमंत्री राजेश टोपे

विधान सभागृहात आपण पहिली मागणी केली होती-माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर

जालना ,२९मार्च /प्रतिनिधी :- समस्त ब्राह्मण समाजाच्या अनेक मागण्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असून या सर्व मागण्या आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. आज 28 मार्च सोमवार रोजी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या  राज्यव्यापी आंदोलना दरम्यान ते बोलत होते.
यावेळी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कराव अंबेकर, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णु पाचफुले, पंडित भुतेकर, मुख्य समन्वयक दीपक रणनवरे, सुरेश मुळे, ॲड. बलवंत नाईक, गजानन जोशी, सचिन वाडे पाटील, एस. व्ही. देशपांडे आदिची उपस्थिती होती.
पुढे बोलतांनी पालकमंत्री टोपे म्हणाले की, अनेक वर्षापासून ब्राह्मण समाज आपल्या मागण्या घेवून शासन दरबारी झटत आहे. ब्राह्मण समाजाच्या मागण्या अद्यापही प्रलंबित असून या सर्व मागण्या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून लवकरात लवकर मागण्या मान्य करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले की, सर्वात आगोदर समस्त ब्राह्मण समाजाने प्रलंबित असलेल्या मागण्याचे निवेदन आपल्याकडे दिले होते. मंत्री असतांना ब्राह्मण समाजाच्या सर्व मागण्या आपण सभागृहामध्ये मांडल्या होत्या. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्यासोबत समस्त ब्राह्मण समाजाच्या मागण्या संदर्भात चर्चा केली होती.  मात्र आजपर्यंत सदर मागण्या निकाली लागल्या नसल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे लवकरच मांडणार असून या सर्व मागण्या मान्य करूण घेणार असल्याचे श्री खोतकर यांनी यावेळी सांगीतले.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कराव अंबेकर म्हणाले, ब्राह्मण समाजाच्या मागण्याला शिवसेनेचा जाहिर पाठींबा असून प्रलंबित मागण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढणार असल्याचे श्री अंबेकर म्हणाले.
राज्यव्यापी धरणे आंदोलनातील मागण्या
ब्राह्मण समाजातील विद्याथ्र्यांना सर्व शिक्षण मोफत करण्यात यावे, ब्राह्मण समाजातील आर्थीक मागास घटकातील तरुणांना व्यवसायीक मदतीसाठी परशुराम आर्थीक विकास महामंडळ स्थापन करावे यासाठी एक हजार कोटीची तरतुद करण्यात यावी, ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह उभारावे, ब्राह्मण पुरोहितांना मासिक 5 हजार रूपये मानधन देवुन त्यांची विविध मंदीरात नियुक्ती करावी ज्याद्वारे प्रत्येक मंदिरात नित्यपुजा लावली जावी, ब्राह्मण समाजातील सेवकांना मिळालेल्या इनामी जमीन वर्ग 2 मधुन वर्ग-1 संवर्गात बदल करण्यात याव्यात त्याचा मालकी हक्क कायम करण्यात यावा, ब्राह्मण समाजाच्या सुरक्षिततेसाठी विशेष कायदा करून सामाजिक विडंबनातून मुक्ता करण्यात यावी, परंपरागत राज्यातील मंदीरे ज्यात्या पुर्ववत वंशपरंपरागत व्यवस्थापनाकडे हस्तांतरीत करण्यात यावी जेणे करून मंदीराचे पावित्र्य व व्यवस्थापन सुस्थीतीत अबाधीत राहील, स्वातंत्र्यवीर सावरकरांना “भाररत्न“ परस्कार देवून सन्मानीत करण्यात यावे, ब्राह्मण समाजाच्या सामाजिक, आर्थीक व शैक्षणीक पातळीवर झालेल्या बदलाचा चांगला वाईट परिणाम शोधण्यासाठी अभ्यास गटाची/आयोगाची शासनस्तरावर नेमणूक करण्यात यावी. यासह अनेक मागण्या आज काढण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदालनामध्ये करण्यात आल्या आहे.

या राज्यव्यापी आंदोलनामध्ये दिपक रणनवरे, सुरेश मुळे, ॲड, सुनिल किनगावकर, गणेश अग्निहोत्री, रामदास आचार्य, संजय देशपाडे, आर. आर. जोशी, विलास नाईक, चंद्रकात कुलकर्णी, दिलीप देशपाडे, एम. एम, जोशी, आर. जी. देशमुख, ॲड. नाईक, ॲड. कुलकर्णी, ॲड. कुलकर्णी, ललित हट्टेकर, ॲड. प्रविण मुळे, दिलीप पोहनेरकर, अमित कुलकर्णी, राहुल मुळे, अमित कुलकर्णी, सुमित कुलकर्णी, विनोद कुलकर्णी,    गजानन जोशी (बीड), मोहन मुळे (जाफ्राबाद), आर. आर. कुलकर्णी (मंठा), ॲड. राखे (परतूर), कपील जोशी, अनिकेत घारे (बदनापूर), शंकर जोशी (वसमत), प्रा. गणेश अग्नीहोत्री, बाळासाहेब थिगळे, शंकर जोशी, सखाराम कुलकर्णी, बंडोपंत कुंटूरकर, रमाकांत जोशी, अनिल डोईफोडे, रविंद्र परळकर, पद्माकर जोशी, रत्नाकर जोशी, अंबादास कानोले, उत्तम कुलकर्णी, सचिन वाडे, महाशिखरचे कोषाध्यक्ष गोविंद कुलकर्णी, कौस्तुभ देशपांडे, संजय क्षीरसागर, विजया कुलकर्णी यांच्यासह समस्त ब्राह्मण समाजाची उपस्थिती होती.