ठाकरे सरकार योजना शासनाच्या लाभ जनतेचा या पुस्तकाचे विमोचन

मुंबई,२२ मार्च  /प्रतिनिधी :- ठाकरे सरकार योजना शासनाच्या लाभ जनतेचा या शिवसेना प्रवक्ता आणि विधान परिषद सदस्या डॉ. मनीषा कायंदे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या पुस्तकाचे विमोचन राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन येथे झाले. याप्रसंगी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे , परिवहन आणि संसदीय कार्य मंत्री अनिल परब, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान उपस्थित होते