कृषी वीजबिल दुरुस्ती शिबिर

जालना : कृषी वर्गवारीतील ग्राहकांच्या वीजबिलांबाबत असणाऱ्या शंका आणि तक्रारी सोडविण्यासाठी महावितरणतर्फे जालना जिल्ह्यात वीजबिल दुरुस्ती शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. १२ मार्च रोजी अंबड, घनसावंगी, परतूर व मंठा उपविभाग कार्यालयात तर १४ मार्च रोजी भोकरदन, १५ मार्च रोजी बदनापूर व जाफराबाद आणि १६ मार्च रोजी जालना ग्रामीण उपविभागातील ग्राहकांसाठी उपविभाग कार्यालयातच शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा लाभ घेत ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता अर्शदखान पठाण यांनी केले आहे.