राष्ट्रीयकृत बँकाकडून मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे कर्ज प्रकरणे मंजूर करण्यास हेतुपुरस्कर पणे टाळाटाळ

स्वातंत्र्य सैनिक पाल्य समितीचे प्रदेशाध्यक्ष बााबासाहेब पाटील कोलते यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली मागणी 

जालना ,९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-राष्ट्रीयकृत बँकाकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे मराठा समाजातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांचे कर्ज प्रकरणे मंजूर करण्यास हेतुपुरस्करपणे टाळाटाळ केली जात असून तात्काळ कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे मराठवाडयातील सर्व राष्ट्रीयकृत बँक व्यवस्थापकांना निर्देश देण्याची मागणी स्वातंत्र्य सैनिक पाल्यसमितीचे प्रदेशाध्यक्ष बााबासाहेब पाटील कोलते यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात बाबासाहेब पाटील कोलते यांनी म्हटले आहे की, मराठा समाजातील तरुणांनी उद्योग व्यवसाय सुरु करुन स्वत:च्या पायावर उभे राहवे यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या मोठया प्रमाणात ठेवी राष्ट्रीयकृत बँकामध्ये ठेवण्यात येतात राष्ट्रीयकृत बँकांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळा अंतर्गत दाखल केलेले कर्ज प्रकरणाचे प्रस्ताव तात्काळ मंजून न करता राष्ट्रीयकृत बँकाचे व्यवस्थापक हे कर्ज प्रकरण मंजूर करण्यास तरुणांना टाळाटाळ करीत आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या सुधारीत योजना राबविण्याबाबत कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभागाने दि.21 नोव्हेंबर 2017 रोजी शासन निर्णय काढून सुचना ‍दिलेल्या आहेत, तसेच महामंडाळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीमती सुचिता भिकाने हिने शाखा प्रबधंक, शाखा व्यवस्थापक, जिल्हा शिखर बँक यांना पत्र देऊन महामंडळा अंतर्गत येणारे कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे आदेश दिलेले असतांनाही सुध्दा राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक व बँक कर्मचारी हे मराठा तरुणांना उद्योग व्यवसाय करण्यापासून वंचीत ठेवत आहे. आतापर्यंत मराठवाडयातील अनेक जिल्हयातील तरुणांनी महामंडळाकडे ऑनलाईन प्रस्ताव दाखल केले व पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव बँकेच्या व्यवस्थापकाकडे दिले परंतु बँक व्यवस्थापकाच्या असहाकार्यामुळे व हलगर्जीपणामुळे मराठवाडयातील अनेक मराठा तरुणांचे कर्ज प्रस्ताव प्रलंबित आहे. परंतु जे आतापर्यंत कर्जप्रकरणे मंजूर झालेले आहेत ते नागरीसहकारी बँकानीच मंजूर केले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हाकार्यालयाकडून अनेक वेळेस कर्ज देणे बाबत व प्रस्ताव दाखल करणे बाबत जनजागृती केली जाते परंतु राष्ट्रीयकृत बँकाचे व्यवस्थापक हे कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे शासनाची ही मराठा तरुणांसाठी असणारी ही योजना बारगाळण्याची शक्यता आहे.

त्यामुळे तात्काळ अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळकडील कर्ज प्रस्ताव प्राप्त झालेल्या मराठवाडयातील  मराठा तरुणांना तात्काळ कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे संबधित राष्ट्रीकृत  बँक व्यवस्थापकांना निर्देश देण्याची मागणी बाबासाहेब कोलते यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात बाबासाहेब पाटील कोलते यांनी म्हटले आहे की, मराठा समाजातील तरुणांनी उद्योग व्यवसाय सुरु करुन स्वत:च्या पायावर उभे राहवे यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या मोठया प्रमाणात ठेवी राष्ट्रीयकृत बँकामध्ये ठेवण्यात येतात राष्ट्रीयकृत बँकांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळा अंतर्गत दाखल केलेले कर्ज प्रकरणाचे प्रस्ताव तात्काळ मंजून न करता राष्ट्रीयकृत बँकाचे व्यवस्थापक हे कर्ज प्रकरण मंजूर करण्यास तरुणांना टाळाटाळ करीत आहे.