मनविसे प्रमुख अमित ठाकरे यांचा जालना जिल्ह्यातर्फे सत्कार

जालना ,११ मार्च / प्रतिनिधी :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित विद्यार्थी सेनेच्या प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल मनविसे प्रमुख अमित ठाकरे यांचा  जालना जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रवींद्र राऊत यांनी विठ्ठल- रूक्मिणीची मूर्ती  भेट देऊन सत्कार केला . 

नुकतेच पुणे येथे मनसेचा 16 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त  झालेल्या सोहळ्यात मनसेचे जालना जिल्हा प्रमुख रवींद्र राऊत यांनी श्री. विठ्ठल- रुक्माई ची प्रतिमा भेट देण्याचे सांगितल्यावर आमित  ठाकरे यांनी खाजगी कक्षात बोलावत पादत्राणे काढली व मूर्तीचा स्वीकार केला. यावेळी मनसे नेते  दिलीप धोत्रे व पदाधिकारी उपस्थित होते .