वैजापूर शहरात आजपासून साई सच्चरित पारायण सोहळा

वैजापूर ,५ मार्च / प्रतिनिधी :- साई बहुउदेशीय सेवाभावी संस्था वैजापूरच्यावतीने शनिवारपासून शहरातील वैद्यनाथ महादेव मंदिर येथे श्री. साई सच्चरित पारायण सात दिवसीय सोहळा आरंभ होत आहे.यासाठी पूर्व तयारी म्हणून गुरुवार रोजी श्री.साईबाबांच्या मूर्तीची स्थापना करून कलश पूजन करण्यात आले.

आरंभी साईबाबा यांच्या मूर्तीचे जलाभिषेक करण्यात आले.कलशपूजन जेष्ठ साईभक्त राजेंद्र लालसरे, जितेंद्र चापनेरकर व गणेश आगळे यांनी सपत्नीक केले. पुरोहित हरीश लालसरे यांनी साई बाबांच्या मूर्तीचे कलश पूजन कार्यक्रम केला.याप्रसंगी आयोजक कैलास साखरे, काशिनाथ भावसार ,महेंद्र काटकर,रामभाऊ उचित, काशिनाथ भावसार, गोविंद दाभाडे, पुजारी साईभक्त अण्णा अधिकार, मेऊल पोकरने, निखिल लुनावत, सचिन राजपूत, केशव आंबेकर,आशिष भाटिया,-देवा भाटिया, सुधीर लालसरे,धोंडीरामसिंह राजपूत अविनाश पोटे, मनोज दौडे उपस्थित होते.