भीमनगर भावसिंगपुरा मधील विविध रस्त्यांचे आमदार दानवेच्या हस्ते लोकार्पण

शिवसेनेच्या माध्यमातून शहरात विकास कामांचा धडाका-आमदार अंबादास दानवे

औरंगाबाद,२८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे , उद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना निधी, नगरविकास खाते, स्थानिक विकास निधी, पर्यटन व पर्यावरण विभाग अशा विविध योजनेअंतर्गत शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असून शहरात विकास कामांचा धडाका सुरू असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले.

आमदार अंबादास दानवे यांच्या स्थानिक विकास निधीतून औरंगाबाद पश्‍चिम शहरातील विविध प्रभागात विकासकामांचे लोकार्पण व उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते.

विविध रस्त्यांचे आमदार दानवेच्या हस्ते लोकार्पण

भीमनगर भावसिंगपुरा प्रभागातील प्रलंबित रस्त्यांच्या विकासकामांसाठी आमदार अंबादास दानवे यांनी आपल्या निधींतून ४० लक्ष रुपये दिले. या निधींतून प्रमुख मागणी असलेला भीमनगर स्मशानभूमीचा रस्त्या व पुलाची जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे  अंत्यत दुरावस्था झाली होती,यामुळें नागरिकांना अंत्यसंस्कारस जाण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागत होता.ही बाब नगरसेविका मनिषा लोखंडे व विभागप्रमुख गणेश लोखंडे आमदार दानवेंच्या निदर्शनास आणून देत रस्त्याचे काम आमदार निधीतून व पुलाचे काम महानगरपालिका निधींतून पूर्ण करण्याबाबत पाठपुरावा केला.

Displaying 20220228_193035-BlendCollage.jpg

त्याचप्रमाणे प्रभातनगर येथील रहिवासी  श्री.काकडे यांच्या घरापासून ते श्री वानखेडे यांच्या घरापर्यंत तसेच  श्री खरात यांच्या घरापासून ते जाधव यांच्या घरापर्यंत व राजे शिवराय कॉलनीतील अंतर्गत गल्ल्यानंमधील  सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे लोकार्पण आमदार दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी वॉर्डाच्या नगरसेविका मनिषा लोखंडे,महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप,शहरसंघटक जयश्री लुंगारे,विभागप्रमुख नरेश भालेराव,गणेश लोखंडे,शाखाप्रमुख जयद्रथ लोखंडे,विनोद लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. भावसिंगपुरा प्रभागातील नागरिकांच्या मागणीचा विचार करून या विकास कामांमध्ये स्वतः जातीने लक्ष घालून लवकर पूर्ण केल्याबद्दल नागरिकांच्या वतीने आमदार दानवे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी राजु खोतकर,अनिल काळे,राहुल पवार,सुमित लखन,हिरा जन्नाडकर,राजु शेंगावकार,अर्जुन लोखंडे,समीर चव्हाण,मच्छिंद्र जाधव,साहेबराव खोतकर,दिपक करोतिया,सुंदरलाल जाधव,पंपा बोरगे,रवी डोंगरे,राकेश करोतिया,शेखर शिर्के वकुशावर्ता चिकटे,निर्मला सुरडकर,मिना नाडे,सरिता बोरगे,इंदूबाई हिवाळे,वैशाली जाधव,कल्पना वानखेडे,वर्षाताई खोतकर आदीं नागरिक व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

Displaying 20220228_193539-BlendCollage.jpg

रामकृष्णनगर – काबरानगर येथील सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे उद्घाटन*
संभाजीनगर पश्चिम शहरातील महानगरपालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक १०९ रामकृष्णनगर – काबरानगर प्रभागातील पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक यांनी लक्ष्मी कॉलनी येथील अंतर्गत रस्ता खराब असल्यामुळे येण्या-जाण्यासाठी अडचणीचा होत असल्याचे निदर्शनास आणून देत सततचा पाठपुरावा केला त्यांची मागणी लक्षात घेत आमदार अंबादास दानवे यांनी तातडीने स्थानिक विकास आमदार निधीतून १० लक्ष रुपये मंजूर करून या सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे उद्घाटन केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख कृष्णा डोणगावकर, महिला संघटिका प्रतिभा ताई जगताप विधानसभा संघटक सुशील खेडकर उपशहरप्रमुख प्रमोद ठेंगडे, उपजिल्हा संघटक जयश्री लुंगारे, शहर संघटक आशा दातार,माजी नगरसेविका सीमा ताई चक्रनारायण, कानूलाल चक्रनारायण, देविदास पवार, सूर्यकांत कुलकर्णी, बोडके काका ,विनायक गवळी काका, अडवोकेट सपकाळ साहेब ,देशपांडे काका, आनंद गायकवाड ,वासुदेव महाजन, श्रीराम मुंडे, यमन गवंडे, डोंगरे साहेब ,सुधाकर निकम ,सुहास मुळे ,अनिल ईप्पर ,अर्जुन भावसार, शरद भोकरे, प्रकाश चोले, प्रभाकर गायकवाड, काकासाहेब आगळे, संजय निकम ,कल्याण चक्रनारायण, विष्णू कापसे ,रवी कुमार, सुरेश शिंदे, संजय पैठणकर, बाबासाहेब बगाडे ,संभाजी वाघ ,मोहन तिरचे, मनोज चव्हाण, कुणाल ठाणगे, सुखराज हिवराळे,  मिलिंद जाधव ,  शिवाजी मिसाळ ,संभाजी मिसाळ,  आनंद गायकवाड, सुहास मुळे, नारायण बादल, पुंडलिक डोंगरे, सपकाळ साहेब, निकम साहेब, देशपांडे , बोडखे , चौधरी , गावंडे , लंगोटे  , चोले  , गिरी आदींची उपस्थिती होती.