अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व आराध्याही कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन व मुलगा अभिषेक बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह काल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आले. त्यांनतर आता ऐश्वर्या राय बच्चन व आराध्या बच्चन या दोघींनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई महानगरपालिकेने तसे जाहीर केले आहे. अमिताभ व अभिषेक कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांची कोरोना चाचणी झाली होती. महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, आधी ऐश्वर्या व आराध्याची प्राथमिक कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. पण दुपारी फायनल रिपोर्टमध्ये ऐश्वर्या व आराध्या दोघीही कोरोना पॉझिटीव्ह आढळल्या. बीएमसीने तसे जाहीर केले.

या दोघींमध्येही कोरोनाचे सौम्य लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे या दोघांनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. बीएमसीची टीम अमिताभच्या जुहू ‘जलसा’ बंगल्यात सॅनिटायझेशन करण्यासाठी पोहोचली आहे. अमिताभच्या याच भागात स्थित प्रतीक्षा आणि जनक बंगलेही स्वच्छ केले आहेत.नानावटी हॉस्पिटलने म्हटले आहे की, अमिताभ-अभिषेक यांचे नियमित वैद्यकीय बुलेटिन दिले जाणार नाही. स्वत: अभिताभ यांनी हॉस्पिटल प्रशासनाला सांगितले की, आपण ट्विटरच्या माध्यमातून आपल्या प्रकृतीविषयी माहिती देत ​​राहू.

शनिवारी रात्री अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विट करत आपण कोरोना पॉझिटिव्ह असण्याबाबतची माहिती दिली होती. अमिताभ बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांनी स्वत:ची कोरोनाची चाचणी करुन घेतली. त्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्यांच्या अजून काही चाचण्या करण्यात येणार आहेत. अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच अनेक कलाकारांनी रिट्विट करत त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना केली आहे.

अभिताब बच्चन हे फायटींग स्पीरिट नेचरचे अभिनेता या वयातही  अॅग्रीयंग मॅन आहेत  येत्या सात दिवसांत ते पुन्हा एकदा नव्याने पहील्या सारखेच कामाला सुरुवात करतील त्यांना एकदम किरकोळ लक्षणे आहेत .करोना संसर्गाच्या साथीचा प्रसार भयंकर झपाट्याने होतो ही स्टार मंडळी स्वतःची एवढी काळजी घेत असताना देखील त्यांना संसर्ग होऊ शकतो याची सर्वसामान्य जनतेने कल्पना केली पाहिजे त्यामुळे कोणीही या सगळ्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली नाही तर  संसर्गापासून कोणीच स्वतःला रोकू शकत नाही या उदाहरणावरून जनतेनी स्वतःची पूर्ण परफेक्ट काळजी घ्यावी असे राजेश टोपे यांनी आवाहन केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.