‘तब्येत अगदी ठणठणीत; स्व-विलगीकरणात नाही’ : राज्यपाल कोश्यारी

राजभवनात करोना संसर्गाच्या साथीची लागण

मुंबई, दि. 12 : आपल्या प्रकृतीसंदर्भात प्रसार माध्यमांत काही ठिकाणी प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार असल्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्ट केले आहे.

त्यांचे परिणाम देखील नकारात्मक आले आहेत. कोरोनाची लक्षणे देखील आपल्यात दिसून आली नाहीत. मात्र, इतरत्र असलेली परिस्थिती पाहून आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहोत. या संदर्भात आपल्या प्रकृतीसंदर्भात काही ठिकाणी येत असलेले वृत्त निराधार आहे. आपली तब्येत चांगली आहे, असे राज्यपालांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.

राजभवनात करोना संसर्गाच्या साथीची लागण झाली असल्याचे  आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात सांगितले राज्यपाल , एकदम स्वस्थ आहेत त्यांच्या सोबत आपण आत्ताच बोललो सगळी चौकशी केली  त्यांच्या कर्मचार्यांच्या निवासस्थानात 16 कर्मचार्यांना करोनाची लागन झाल्याचे स्पष्ट झाले आहे आणखीन काही तपासणीसाठी दिलेल्या नमुन्यांचे रिझल्ट येणे बाकी असल्याचे टोपे यांनी सांगितले.राज्यपालांचे प्रधान सचिव आणि त्यांचे जवळचे व्यक्तीगत  कर्मचारी स्वस्थ आहेत व्यक्तीगत कार्यालयात काहीही अडचण नाही  मात्र कर्मचारी निवासस्थानी संसर्गाची लागण झाली आहे प्रोटोकॉल प्रमाणे ट्रेसिंगचे काम मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे पुढे जे हायरिस्क काॅन्टॅक्टस् असतील त्यांना नियमानुसार क्वारंटाईन करण्याच्या सुचना आपण दिल्या आहेत सगळी कारवाई एकदम व्यवस्थित केली जात आहे राज्यपालांच्या कार्यालयाचा प्रश्न असल्याने राज्य सरकारच्या वतीने आपण स्वतःच पूर्ण लक्ष ठेवून काळजी घेत असल्याचे टोपे यांनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *