नवजात बाळ पळविणाऱ्या महिलेला अटक करण्यात जालना पोलिसांना यश

जालना ,९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-जालना जिल्हा महिला व बाल रुग्णालयातुन नवजात बाळ पळविणाऱ्या  महिलेला  पोलिसांनी ताब्यात घेऊन, बालक मातेच्या कुशीत सुखरुप सुपूर्द केले आहे.

Displaying IMG-20220208-WA0026.jpg


 सोमवार दिनांक 7 रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे एका महिलेची प्रसृती झाल्यानंतर तिच्या शेजारी असलेल्या एका अनोळखी बाईने प्रसृती झालेल्या बाईशी ओळख करु विश्वास संपादन करुन बाळाला उन्हात बाहेर घेऊन जाते असे म्हणुन एक दिवसाच्या बालकास पळवुन नेले होते. 
सदरच्या घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी भेट देऊन बालकास पळवून नेलेल्या महिलेच्या अनुषगाने माहिती घेत संपुर्ण शहरामध्ये शोध घेत असतांना तांत्रीक विश्लेषण दरम्यान एक महिला ही जालना रेल्वे स्टेशनवरुन परभणीकडे जाणा-या रेल्वेने गेल्याची माहिती मिळाली त्या अनुषगाने स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने सी.सी.टी.व्ही. तपासले.
परिसरातील नागरिक यांच्याकडू सदर महिले बाबत माहिती घेतली असता सदर महिला ही परभणीकडे जाणार असल्याचे समजले. त्यावर जालना स्थानाकावरुन परभणीकडे जाणा-या सर्व रेल्वेची माहिती घेतली.
पोलीस परभणी रेल्वे स्टेशनवर  पोहचले. तेथील सर्व सी.सी.टी. फुटेजचे विश्लेषण करुन एक संशयीत महिला ही रेल्वे स्टेशनच्या बाहेर बालकासह रिक्षामध्ये जाताना दिसून आली. त्यावरुन सदर पथकाने संबंधीत रिक्षा चालकास विचारपुस करुन सदर महिलेस कोठे सोडण्यात आले? याबाबत माहिती घेतली असता रिक्षा चालकाने संशयीत महिलेस सामान्य रुग्णालय, परभणी येथील रोडवर सोडल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने सामान्य रुग्णालय, परभणी येथील रुग्णांना व रुग्णालयात स्टाफ कर्मचारी यांना सदर संशयीत महिलेबाबत विचारपुस केली असता सदर महिला ही सायंकाळी ५ वाजेपर्यंत हॉस्पिटल परिसरातील झाडाखाली बसलेली असल्याचे समजले. तेव्हा तेथील काही कर्मचाऱ्यांकडुन माहिती मिळाली की, सदर महिलेने एका व्यक्तीच्या मोबाईलवरुन तिचे नातेवाईकास फोन लावून त्यास बोलावून घेतले होते व सामान्य रुग्णालयात तिची व बालकाची नोंद करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिचा हा प्रयत्न अयशस्वी झाला व ती तेथुन निघुन गेली होती. *काल सकाळी हे बाळ चोरीला गेल्यानंतर कदीम जालना पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महिला आणि बाल रुग्णालय गाठून तातडीनं या प्रकरणाची चौकशी सुरू करत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  सुभाष भुजंग, व  कदीम जालना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश टाक, यांनी पथकं स्थापन करून विविध ठिकाणी रवाना केले होते.
त्यावरुन सदर पथकाने रुग्णालयात तांत्रीक तपास करुन सदर महिला ही सेलु येथील रहिवाशी असल्याचे निष्पन्न करुन तात्काळ सेलु येथील गायत्रीनगर भागात जाऊन वस्तीतील जाफर शेख याच्या घरी जाऊन पाहणी केली असता एक महिला बालकासह मिळुन आली. सदर महिलेकडे जवळ असले बालकाच्या संबंधाने विचारपुस केली असता तिने काही एक माहिती सांगितली नाही, जालना रुग्णालयात असलेल्या बालकाच्या तळपायावरील निळया शिक्यांची पाहणी केली त्यावरुन सदर बालक हे जालना जिल्हा रुग्णालयातील पळवून नेल्याचे निष्पन झाले. सदर महिलेस विश्वासात घेऊन विचारपुस करता तिने केल्याचे सांगितले आहे.
दिनांक 08 मंगळवार रोजी सदर पळवून नेलेल्या बालकास त्याच्या आईकडे सुखरुप देण्यात आलेले आहे. सदर संशयीत महिला आरोपीस पुढील कार्यवाही कामी पोलीस ठाणे कदीम जालना येथे ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपी महिलेस मुलबाळ नसल्यामुळे व तिचा बऱ्याच वेळेस गर्भापात झाल्यामुळे बाळ चोरल्याचे आरोपी महिलेनी कबूल केले. 
सदरची कार्यवाही  पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, दुर्गेश राजपूत, पोउपनि, अंमलदार सॅम्युअल कांबळे, विनोद गडदे, सचिन चौधरी, सागर बाविस्कर, दत्तात्रय वाघुडे, वाघमारे, कैलास चेके, योगेश सहाने, चालक रमेश पैठणे महिला अंमलदार चंदकला शडमल्लु, गो सरोदे यांनी केलेली आहे.

मोबाईल फोनचे आकर्षण संकटाला निमंत्रण

बाळाला मांडीवर घेऊन ऊन्हात बसलेल्या रूक्साना अहेमद यांच्या नातेवाईक महिलेस मोबाईल फोन करमणूकीसाठी पाहीजे होता तो आणण्यासाठी ती महिला वार्डात गेली आणि बाळ आरोपी महिलेच्या ताब्यात दिले मोबाईल फोन शिवाय करमत नाही या संधीचा पुरेपूर फायदा उचलत आरोपी महिलेने ते बाळ घेऊन पोबारा केला .मोबाईल फोन चे आकर्षण संकटाला निमंत्रण देणारे ठरले .