प्रेयसीचा गळा दाबून खून:आरोपी प्रियकरास पोलिस कोठडी

औरंगाबाद,१८ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-लग्नासाठी तगादा लावला म्हणुन प्रेयसीचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्‍या शरिराच्‍या खांडोळ्या करुन विल्हेवाट लावण्‍याचा प्रयत्‍न करणाऱ्या आरोपी प्रियकरासह त्‍याच्‍या एका साथीदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सौरभ बंडु लाखे (३१) आणि सुनिल गंगाधर धनेश्र्वर (२५, दोघे रा. शिऊर ता. वैजापुर) अशी अटक करण्‍यात आलेल्या आरोपींची नावे असून त्‍यांना २३ ऑगस्‍टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एम.एम. माळी यांनी गुरुवारी दि.१८ दिले.

गुन्‍ह्यात संपूर्ण कट रचून प्रेयसीचा खून करण्‍यात सामील असलेल्या आरोपींच्‍या आणखी एक साथीदार मन्‍वर उस्‍मान शहा (रा. शिऊर ता. वैजापुर) याचा पोलिस कसुन शोध घेत आहेत.

या प्रकरणात उपनिरीक्षक रमेश राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सिडको पोलिस ठाण्‍यात आरोपी सौरभ लाखे, सुनिल धनेश्र्वर आणि मन्‍वर शहा यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

अटक आरोपी सौरभ लाखे आणि सुनिल धनेश्र्वर यांची चौकशी केली असता, आरोपी सौरभ लाखे व अंकिता यांच्‍यात भांडण सुरु होते. अंकिताने लग्नासाठी आरोपीकडे तगादा लावत, लग्न कर नाहीतर तुझ्या घरी येवून राहते अशी धमकी दिलली होती.

१५ ऑगस्‍ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्‍या सुमारास आरोपी सैरभ व त्‍याचा साथीदार मन्‍वर शहा यांनी कट रचून अंकिताचा हाताने गळा दाबुन तिचा खून केला. त्‍यानंतर आरोपी रुमला बाहेरुन कुलूप लावून शिऊरला गेला.

१६ ऑगस्‍ट रोजी दुपारी एक वाजेच्‍या सुमाराम आरोपी हा अंकिताच्‍या घरी आला व त्‍याने अंकिताचे मुंडके, डावा हात कापून सायंकाळी पिशवी मध्‍ये भरुन दुचाकीवर (क्रं. एमएच-२०-९६४८) शिऊर येथे नेत एका फर्निचरच्‍या गोडाऊन मध्‍ये लपवून ठवले.

१७ ऑगस्‍ट रोजी सकाळी साडेदहा वाजेच्‍या सुमारास आरोपी सौरभ त्‍याचा साथीदार सुनिल धनेश्र्वर यांनी कारमध्‍ये (क्र. एमएच-२०-सीएच-३०७६) असे अंकिताच्‍या घरी आले. त्‍यानंतर अंकिताचे मुंडके आणि हात नसलेले धड कामध्‍ये टाकून ते धड जाळण्‍यासाठी शिऊरला घेतवून जात होते. त्‍यावेळी नाकाबंदी करणाऱ्या देवगाव रंगारीच्‍या पोलिसांनी त्‍यांना अटक केली.

आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील जरीना दुरार्णी यांनी गुन्‍हा करतेवेळी आरोपींनी परिधान केलेले कपडे, गुन्‍ह्यात वापरलेली दुचाकी हस्‍तगत करायची आहे.

आरोपींचा पसार तिसरा साथीदार मन्‍वर शहा याला अटक करायची आहे. गुन्‍ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे काय, गुन्‍ह्याचे खरे कारण काय आहे याचा तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालाकडे केली.