गावठाण जमिनी नावावर: सात माजी सरपंचांसह निवृत्त गटविकास अधिकारी व पाच निवृत्त ग्रामसेवकांच्या विरोधात गुन्हा

जालना ,९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-शासनाच्या मालकीच्या गावठाण जमिनी नागरिकांना त्यांच्या खाजगी मालकीच्या करून देणारे  टेंभुर्णी ता. जाफ्राबाद येथील सात माजी  सरपंच, निवृत्त  गटविकास अधिकारी व पाच निवृत्त ग्रामसेवकांच्या  विरोधात जमिनींच्या अपहार करून  शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेंभुर्णी येथील गट क्रमांक 1,195 व 259 यासह गावठाण मधील  328 एकर जागा  सरपंच, गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांनी संगणमत करून गावातील नागरिकांच्या मालकी हक्काच्या करून दिल्या शासनाच्या विविध दस्तावेजात बनावट नोंदी करण्यात आल्या त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या रेकॉर्ड व गाव नमुना नंबर आठ मध्ये सुमारे सातशे  लोकांना या सरकारी जमिनीचा मालकी हक्क देण्यात आला. 

1)निवृत्त  ग्रामविकास अधिकारी पी.आर.मोरे रा.टेंभूर्णी 2)गटविकास अधिकारी पंचायत समिती जाफ्राबाद जी.एस.सुरडकर,रा.मसला,ता.जि.बुलढाणा .3)निवृत्त ग्रामविकास अधिकारी  पी.ए.तांबीले रा.वेणी ता.लोणार,जि.बुलढाणा.4)निवृत्त ग्रामविकास अधिकारी पी.पी.तायडे रा.भडगांव ता.जि.बुलढाणा.5)निवृत्त ग्रामविकास अधिकारी आर.बी.साळवे रा.वरूड बु . ता.जाफराबाद 6)निवृत्त ग्रामविकास अधिकारी ई.एम.थोरात रा.सेलू जि.परभणी 7) तत्कालीन सरपंच पी.एस.वाघमारे रा.टेंभूर्णी 8)तत्कालीन सरपंच बद्रुद्दीन कमरोद्दीन सिध्दीकी रा.टेंभूर्णी 9)तत्कालीन सरपंच संध्या देशमुख रा.टेंभूर्णी 10)तत्कालीन सरपंच साळूबाई धनवई रा.टेंभूर्णी 11)तत्कालीन सरपंच संगीता शिंदे रा.टेंभूर्णी 12)तत्कालीन सरपंच लक्ष्मण शिंदे रा.टेंभूर्णी व 13)तत्कालीन सरपंच विष्णू जमधडे रा.टेंभूर्णी. यांच्या विरोधात शासकीय जमिनीचा अपहार करून शासनाची फसवणूक केली या आरोपाखाली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …….सन 1983 पासून सन 2013 या तीस वर्षांत या सरकारी जमिनीचा दिवसाढवळ्या राजरोसपणे अपहार सातत्याने सुरू होता त्यावेळेस असलेले सरपंच, ग्रामविकास अधिकारी व तहसीलदार,तलाठी, गटविकास अधिकाऱ्यांनी सुमारे सातशे पेक्षा अधिक लोकांना या जमिनीवर मालकी हक्क देऊन बसवले यातील अनेक जमिनींच्या खरेदी विक्रीचे खूप मोठ्याप्रमाणात  बेकायदेशीर व्यवहार झाले आहेत या प्रकरणी फकीरचंद खांडेकर या इसमाने लोकायुक्तांकडे तक्रार केली होती लोकायुक्तानी संबंधित अधिकारी व सरपंचांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले मात्र प्रस्थापितांनी मोठ्या प्रमाणात दबाव आणून प्रकरणात चालढकल केली यानंतर खांडेकर यांनी  उच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यात महसूल विभागाच्या तत्कालीन सहा  तहसीलदार नऊ मंडळ अधिकारी व नऊ तलाठी यांच्या विरोधात तपासात गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. सदरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.