विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद: लसीचा तुटवडा झाल्यामुळे 250 विद्यार्थ्यांचेच लसीकरण

वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात कोविड लसीकरण 

वैजापूर,७ जानेवारी /प्रतिनिधी :- वैजापूरात नगर परिषद व उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कोविड लसीकरणसाठी कंबर कसली असून विविध टीम तयार करून विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे.

Displaying IMG-20220107-WA0103.jpg

शुक्रवार रोजी महाविद्यालयात स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत, पर्यवेक्षक एम.आर.गणवीर, महाविद्यालयातचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे, उपप्राचार्य एस.बी.साळुंके, प्राध्यापक ए.डी.कर्डीले, उपजिल्हा रुग्णालयचे श्याम उचित यांनी विद्यार्थ्यांना कोविड लसीकरणाचे महत्व विशद करून त्यांना लसीस प्रवृत्त केले.

अकरावी व बारावीचे विद्यार्थी लस घेण्यास तयार झाले व मोठी गर्दी केली यावेळी फक्त 250 डोस देण्यात आले. विद्यार्थी संख्या अधिक होती यामुळे उरलेले विद्यार्थी लस घेण्यासाठी उत्सुक असताना त्यांचे लसीकरण होऊ शकले नाही. पालिका मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्याशी  संपर्क साधून लस पुरविण्याची विनंती केली. तिसऱ्या लाटेमुळे विद्यार्थी व पालक ही सतर्क झालेले आहेत जिल्हा प्रशासनाने तात्काळ कोविड लसीचा जास्तीचा पुरवठा करावा अशी अपेक्षा आहे.म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण करणे सोयीचे होईल. असे मुख्याधिकारी बिघोत म्हणाले.