पोलिसांकडून कार्यकर्त्यांची अडवणूक, अखेर मुंबईत झाली एमआयएमची सभा

Image

वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याची  सीबीआय चौकशी  करण्यात यावी -खासदार जलील

खासदार जलील यांची तिरंगा रॅली मुंबईत 

Image

मुंबई,११ डिसेंबर /प्रतिनिधी:- मुंबईत ओमायक्रॉनचा धोका आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाकडून 12 डिसेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जमावबंदीनुसार कोणतीही राजकीय सभा घेण्यास परवानगी नाही. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या सभेला परवानगी नसल्याचं स्पष्ट केले . मात्र यानंतरही एमआयएम नियोजित सभा घेण्याच्या भूमिकेवर ठाम होते.मुंबईमध्ये रॅली आणि मोर्चा काढण्यास मनाई असताना सुद्धा एमआयएमची सभा अखेर मुंबईमध्ये पार पडली. 

या नियोजित सभेसाठी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली. ही तिरंगा रॅली मुंबईत दाखल झाली. या रॅलीत शेकडो कार्यकर्ते होते. मात्र जमावबंदी असल्याने पोलिसांनी एमआयएमच्या कार्यकर्त्यांना वाशी आणि मानखुर्द इथे अडवले . यानंतरही कार्यकर्ते ही सभा होणारच, असा ठाम निर्धार हा कार्यकर्त्यांनी केला.सभेच्या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आह

मुंबईमध्ये एमआयएमची तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून लोक मुंबईच्या दिशेने आले  आहेत. मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. असे असताना रॅली काढण्याचा निर्धार खासदार इम्तियाज जलील यांनी केला. 

Image

ठाण्यातही एमआयएम कार्यकर्त्यांना अडवले . तर नवी मुंबईतही कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवण्यात आल्या आहेत. तरीही कार्यकर्ते रॅलीसाठी येण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत. दोन गाड्या नवी मुंबईमध्ये अडवण्यात आल्या. 

मालेगावच्या एमआयएम कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही कार्यकर्ते मुंबईला जाण्यासाठी ठाम होते. सुमारे साडेपाच तास केले होते स्थानबद्ध केले होते.

उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.खालिद परवेज यांच्यासह 25 कार्यकर्त्यांना अटक केली आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनी आणि मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे औरंगाबादहून मुंबईत दाखल झाले. दिवसभर अनेक ठिकाणी पोलिसांनी जलील यांच्या रॅलीतील वाहनांना अडवून तपासणी केली. त्यामुळे काही ठिकाणी पोलिसांसोबत बाचाबाची झाली तर कुठे समर्थकांना परत पाठवण्यात आले. पण, जलील आपल्या समर्थकांसह मुंबईत दाखल झाले. मुंबईतील चांदिवलीमध्ये सभा पार पडली.

पोलिसांनी मुंबई रॅली घेण्यास आधीच मनाई केली होती. पण तरीही नियम मोडून ही सभा घेण्यात आली. या रॅलीनंतर पोलीस काय कारवाई करणार आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याची  सीबीआय

चौकशी  करण्यात यावी -खासदार जलील

वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याची  सीबीआय चौकशी  करण्यात यावी, अशी मागणी  औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.  तसेच हिमंत  असेल तर राज्य सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या घोटाळ्याप्रकरणी चौकशी लावावी, असे  थेट आव्हानच जलील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले आहे. 

मुस्लिमांच्या भल्यासाठी काही ठराविक जागा देण्यात येते. त्या संपत्तीला वक्फ म्हंटलं जातं. या जागावाटपेतून होणाऱ्या उत्तपन्नाची माहिती ठेवण्याची जबाबदारी ही वक्फ बोर्डाची असते. राज्यात वक्फ बोर्डाच्या नावे एकूण 23 हजार 566 मालमत्ता आहेत. वक्फ बोर्डाकडे एकूण 37 हजार 330 हेक्टर इतकी जागा आहे. 

वक्फ बोर्डाचा 1 हजाराहून अधिक मालमत्तांवर बेकायदेशीररित्या कब्जा करण्यात आलेला आहे. वक्फशी संबधीत असलेल्या संघटनाही या जागा भाडेतत्वावर देऊ शकतात. या भाड्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.  

‘अनेक अडथळे टाकले मी पार करून आलो. पण इमानदारीचा प्रयत्न नेहमी यश देतो. काही फिल्म दाखवून मुस्लिमांना कसं वापरलं जातंय ते दाखवला जाणार आहे. पण समाजातील लोकांसाठी 100 नाही 200 टक्के राजकारण करणार आहे. या रॅलीत लोक स्वतः इथे आले आहेत कुणालाही गाडी नाही दिली, कुणालाही पेट्रोल नाही दिले, असेही जलील म्हणाले.

मुस्लिम समाजातील अनेक बांधवांची हक्काची असलेली  वक्फ बोर्डाची हजारो कोटींची जमीन कुठे गेली. 9 जणांवर गुन्हे आता दाखल केले आहे. पैशांच्या जोरावर जमिनी हडपल्या. त्याच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहेत, असा खुलासाही जलील यांनी केला.