जातेगांव-टेंभी ग्रामपंचायत कार्यालयासह विविध विकास कामांचे आ.बोरणारे यांच्या हस्ते लोकार्पण

वैजापूर ,२८ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील जातेगांव-टेंभी येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासह 35 लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमीपूजन आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याहस्ते शनिवारी झाले.

शिवसेना आमदार रमेश पाटील बोरणारे व जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या टेंभी ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम ( 12 लक्ष रुपये ), गावअंतर्गत सिमेंट रस्ता ( 10 लक्ष रुपये )स्मशानभूमी बांधकाम ( 5 लक्ष रुपये ),जिल्हा परिषद शाळा क्रीडा साहित्य वाटप ( 3 लक्ष रुपये), कऊटगांव स्मशानभूमी बांधकाम ( 5 लक्ष रुपये ) अशा एकूण 35 लक्ष रुपये खर्चाच्या विकास कामांचे लोकार्पण आ.बोरणारे यांच्याहस्ते यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष साबेर खान, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे,शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचीन वाणी, उपतालुकाप्रमुख कल्याण जगताप, माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, बाळासाहेब जाधव, नगरसेवक डॉ.निलेश भाटिया, युवासेनेचे शहरप्रमुख श्रीकांत साळुंके,डॉ.प्रकाश शेळके, राजू गलांडे, गोटू सिंग राजपूत, अरुण शेलार, प्रकाश आल्हाट, सरपंच श्वेतल देवदत्त पवार, भाऊसाहेब बनसोडे, साहेबराव पवार, अमोल बोरणारे, प्रवीण पवार,विशाल पवार, आशा पवार, ग्रामसेवक मांदवडे मुख्याध्यापिका श्रीमती म्हस्के यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.