नियमित व्यायाम करताना अ‍ॅपच्या मदतीने करा समाजात इम्पॅक्ट

मॅजिकतर्फे आयोजित इंटरव्यू सिरीजमध्ये इम्पॅक्ट अ‍ॅपचे संस्थापक ईशान नाडकर्णी यांनी व्यक्त केले मत

औरंगाबाद,२८ नोव्हेंबर /प्रतिनिधी:-एखादी व्यक्ती चालण्यासारख्या व्यायामाच्या प्रक्रियेतून समाजाला काही मदत करू शकते का या कल्पनेतून इम्पॅक्ट या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली, या अ‍ॅपमध्ये चालण्याच्या प्रत्येक पावलाचे रुपांतर पैशात करून त्याचा सामाजिक उपक्रमासाठी वापर केला जातो अशी माहिती इम्पॅक्टचे संस्थापक ईशान नाडकर्णी यांनी सांगितले. ते मॅजिक तर्फे अ‍ॅप   आयोजित इंटरव्यू सिरीजमध्ये बोलत होते.

दैनंदिन आयुष्यात प्रत्येक व्यक्ती अनेक क्रिया करत असतो, आणि याचा विचार करून चालण्याच्या प्रक्रियेतून समाजासाठी काही योगदान देता येईल या कल्पनेतून इम्पॅक्टची निर्मिती करण्यात आली. इम्पॅक्ट हे आरोग्य अ‍ॅप असून, यावर टाकलेले प्रत्येक पाऊल सामाजिक कारणासाठी पैसे उभे करते. आजपर्यंत, २५ लाख युझर्सनी ९० कोटी  किलोमीटर अंतर कापून या अ‍ॅपच्या माध्यमातून १९० कोटी पेक्षा अधिक निधी जमा केला आहे. या करिता  सीएसआर प्रकल्पांतर्गत ४० पेक्षा जास्त कॉर्पोरेट कंपन्याची मदत झाली, असे ते म्हणाले. आगामी काळात ध्यान, सायकलिंग आणि इतर वर्कआउट्स या अॅपला जोडण्याची योजना असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

मॅजिकतर्फे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आयोजित होणाऱ्या इंटरव्यू सिरीज या उपक्रमात स्टार्टअप्सच्या माध्यमातून यश मिळवलेल्या व्यक्तीं आपला व्यावसायिक प्रवास उलगडद असतात, तसेच होतकरू स्टार्टअप्सना मार्गदर्शन करतात. या इंटरव्यू सिरीजचा हा सहावा उपक्रम होता.

आपल्या प्रवास उलगडून सांगताना ईशान म्हणाले , एका छोट्या कल्पनेतून पुढे आलेले आणि गेट फिट, डू वेल’ हे ब्रीदवाक्य असलेल्या ही  अ‍ॅप  आज लाखो लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य अंग झाले आहे. तंत्रज्ञानाने मानवी आयुष्यात अनेक चांगले, वाईट परिणाम केले आहे, आज अनेक व्यक्ती या मोबाईलच्या आहारी गेल्याचे आपण बघतो, पण याच गोष्टींचा त्याच्या आणि एकूणच समाजाच्या चांगल्यासाठी वापर करता आला याचे आम्हाला समाधान असल्याचे, ते म्हणाले. इंटरव्यू सिरीजच उपक्रमाच्या माध्यमातून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मॅजिकचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मॅजिकचे सीइओ रोहित औटी यांनी मॅजिकबद्दल माहिती देतांना सांगितले कि २०१८ मध्ये  स्थपना झालेले मॅजिक हे देशातील पहिले औद्योगिक संस्थेद्वारा कार्यान्वित इनक्युबेशन सेंटर असून, मागील तीन वर्षात मराठवाडा तसेच देशपातळीवर नाविन्यपूर्ण नवउद्योजक निर्माण करण्याकरिता काम करीत आहे. इंटरव्यू सिरीजच्या माध्यमातून विभागातील विविध शैक्षणिक संस्थांच्या मदतीने विद्यार्थ्यासांठी आणि उद्योजक बनण्याची महत्वाकांक्षा असलेल्यांना या क्षेत्रात यश मिळवलेला उद्योजाकांसोबत संवाद साधण्याची, तसेच त्याच्या यशाचे गमक माहित करून घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते असे सांगितले, श्रीयश शैक्षणिक संस्थेच्या इडीसी सेलचे आणि व्यवस्थापन कॉलेजचे प्रमुख अनिल पालवे यांनी माजिकतर्फे आयोजित या उपक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार असून, भविष्यात अनेक उपक्रमामध्ये सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. संस्थेच्या माध्यमातून  उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून दिली जात असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मॅजिकचे योगेश तावडे आणि क्षितीज चौधरी यांनी केले.