समाजातील उपेक्षित महिलांना आत्मनिर्भर बनविण्यावर भर-संतोषसिंग

इनरव्हील क्लब औरंगाबाद डिस्ट्रिक्ट चेअरमन भेट

 औरंगाबाद,२७ नोव्हेंबर /प्रतिनिधी:-समाजातील उपेक्षित तसेच गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबतच आत्मनिर्भर होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा असे सांगातले. इनरव्हील क्लबकडून समाजातील गरजू महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासोबतच रोजगार मेळावे तसेच कार्यशाळा घेतल्या जात आहेत. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठही उपलब्ध करून दिली जाते असे प्रतिपादन इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन संतोषसिंग यांनी औरंगाबाद भेटी दरम्यान केले. 

यावेळी अध्यक्षीय भाषणात इनरव्हील क्लब, औरंगाबादच्या अध्यक्ष लता मुळे म्हणाल्या की उपेक्षित आणि तळागाळातील गरजू लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी इनरव्हील क्लब अनेक वर्षापासून सातत्याने प्रयत्न करीत असून त्यांना सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून प्रयत्न करीत आहे. कोरोना महामारीच्या कालावधीत अनेकांचे रोजगार तसेच कुटुंबात कर्ता व्यक्ती हिरावला गेला, अशा कठीण परिस्थितीत गरजूंना सर्वप्रकारची मदत करून देण्यासाठी इनरव्हील क्लबनी मोलाचे सहकार्य केले. तसेच समाजातील उपेक्षित आणि  समस्याग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेवून त्यांच्या कौटुंबिक समस्या सोडवल्या आणि त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी इनरव्हील क्लब, औरंगाबादने प्रयत्न केले आणि हे कार्य पुढेही करत रहाणार आहे.याप्रसंगी ‘आरंभ’ सामाजिक संस्थेच्या ‘स्वमग्न’ मुलं आणि मुलींनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंचे विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तसेच मेळावा आणि प्रदर्शन ठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. रांगोळी काढणाऱ्या महिलांना इनरव्हील क्लब औरंगाबादच्या वतीने साडी, चोळी आणि रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.                        

यावेळी इनरव्हील क्लब, औरंगाबादच्या अध्यक्ष लता मुळे, व्हॉइस चेअरमन छाया भोयर, सेक्रेटरी वर्षा पटेल, ट्रेजरर शिवानी लड्डा, आय. एस. ओ. अंजली सावे, एडिटर अंजली दाशरथी, माजी जिल्हाध्यक्ष ऊषा धामणे, क्लब करंडपॉन्ट रेखा केदारे, कमिटी मेंबर शामल भोगले ,वृशाली उपाध्ये, प्रतिभा धामणे, आशा भांड आणि माधुरी अहिरराव आणि सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन ऊषा धामणे आणि आभार छाया भोयर यांनी प्रभावी प्रमाणे केले. मेळाव्यानंतर राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.