शितल वाईन एजन्सी फोडुन चोरी,मुख्य सुत्रधाराला पकडण्यात पोलिसांना यश

औरंगाबाद:

दारुचे गोडावुन फोडुन साडेचार लाखांची दारु चोरुन नेल्या प्रकरणी तब्ब्ल अडीच महिन्यांनी गुन्ह्यातील मुख्य सुत्रधाराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. ज्ञानेश्र्वर रावसाहेब पिंपळे (38, रा. चौधरी कॉलनी, दत्तनगर, चिकलठाणा) असे आरोपीचे नाव आहे. त्याला 3 जूलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.डी. सृंगारे-तांबडे यांनी मंगळवारी (दि. 30) दिले.

प्रकरणात शितल हसानंद माकिजा (61, रा. रोपळेकर हॉस्पीटल जवळ, सम्राटनगर) यांची पंढरपुर येथील शितल वाईन एजन्सी असुन 13 ते 14 एप्रिल दरम्यान चोरट्यानी सदर एजन्सी फोडुन चार लाख 51 हजार 560 रुपये किंमतीचे दारुचे बॉक्स चोरले तर पाच लाख 11 हजार 200 रुपयांच्या दारुच्या बॉक्सला आग लावुन नुकसान केले होते. प्रकरणात एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेजच्या आधारे तपास करुन आरोपी बाळु पिंपळे याला 16 एप्रिल रोजी अटक केली. त्याने महेश सिताराम काळे, ज्ञानेश्वर रावसाहेब पिंपळे व चंद्रभान रावसाहेब पिंपळ व इतर तीन जणांसोबत मिळुन गोडावुन फोडुन चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 3 लाख 28 हजार 20 रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी बाळूची न्यायालयाने पोलिस कोठडी दरम्यान न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.

त्यानंतर तब्बल अडिच महिन्यांनी मंगळवारी (दि. 30) पोलिसांनी गुन्ह्यातील मुख्यसुत्रधार तथा आरोपी ज्ञानेश्र्वर पिंपळे याला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता चोरी केलेल्या दारुच्या बॉक्स पैकी एक लाख 23 हजार 540 रुपये किंमतीचे दारुचे बॉक्स आरोपी घेवुन गेला होता, ते जप्त करणे आहे. आरोपीच्या साथीदारांना अटक करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील जनार्दन जाधव यांनी न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीला 3 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *