वैजापूर शहरातील 65 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

वैजापूर ,७ जुलै  /प्रतिनिधी :-वैजापूर शहरातील सोंदेवाडी परिसरातील 56 वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.6) सकाळी येथे घडली. भारती उदय सोंदे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारती सोंदे या सोंदेवाडी परिसरात कुटंबासह राहत होत्या. बुधवारी सकाळी त्यांचे पती बाहेरगावी जाण्यासाठी घराबाहेर गेले तर त्यांचा मुलगा एका खोलीत होता. दरम्यान,सकाळी पावणे सहाच्या सुमारास भारती सोंदे यांनी घरातील दुसऱ्या खोलीत छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही माहिती समजताच बाहेरगावी निघालेले त्यांचे पती तातडीने घरी परतले.भारती यांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी वैजापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक फौजदार रजाक शेख करीत आहेत.