“आजादी का अमृत महोत्सव”अंतर्गत पोलिस विभागातर्फे वैजापूर शहरात विविध ठिकाणी ‘आपले अधिकार’ फलकाचे अनावरण

वैजापूर,१३ नोव्हेंबर/प्रतिनिधी :-भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार “आझादी का अमृत महोत्सव” साजरा करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य विधिसेवा प्राधिकरण मुबई अंतर्गत पोलिस  विभागातर्फे वैजापूर पोलीस स्टेशनसह शहरात विविध ठिकाणी ‘आपले अधिकार’ फलकाचे अनावरण उपविभागीय पोलिस  अधिकारी कैलास प्रजापती यांच्याहस्ते शनिवारी (ता.13) करण्यात आले.

शहरातील  वैजापूर पोलिस ठाण्यात तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या पोलिस  चौकी व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय परिसरात ‘आपले अधिकार’ हे फलक लावण्यात आले.सहाय्यक पोलिस निरीक्षक भागवत, पोलिस उपनिरीक्षक घाडगे, पोलिस पाटील सूर्यकांत मोटे,शंकर कवडे,भाऊसाहेब रहाणे,अर्जुन साठे,देविका राजपूत,प्रभाकर जगताप,नितीन बागुल,राजेंद्र मोडके, भडाईत पाटील,राजू लांडे,मच्छीन्द्र धनाड,राजू आहेर आदी उपस्थित होते.
गावांमध्ये 100 टक्के लसीकरण करून घ्या -उपविभागीय पोलिस  अधिकारी कैलास प्रजापती यांचे आवाहन
गावपातळीवर पोलिस  पाटील हा महत्वाचा दुवा असून,आपल्या गावामध्ये 100 टक्के लसीकरण करून घेण्यासाठी पोलीस पाटील,सरपंच,उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य,आशाताई, अंगणवाडी सेविका ,ग्रामसेवक व तलाठी यांनी पुढाकार घ्यावा व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशानुसार गावपातळीवर पदाधिकारी व शासकीय कर्मचाऱ्यांनी लोकांमध्ये जनजागृती करून गावांतील नागरिकांचे 100 टक्के लसीकरण करून घ्यावे असे आवाहन उपविभागीय पोलिस  अधिकारी कैलास प्रजापती यांनी आज वैजापूर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित पोलिस पाटलांच्या बैठकीत केले.

लसीकरण करून न घेतल्यास शासनाकडून मिळणाऱ्या विविध सोयी -सवलतीपासून वंचित राहण्याची वेळ लोकांवर येऊ नये यासाठी लसीकरण करून घेण्याबाबत लोकांना सूचित करावे असेही ते यावेळी म्हणाले.या बैठकीस तालुक्यातील पोलिस पाटील उपस्थित होते.