वैजापूर येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दानवे यांचा शिंदे गटाच्या आमदारांवर हल्लाबोल ; ‘बोके अन खोके’ म्हणून कोणी हिणवले तर का चालत नाही?

कुंडली आमच्याकडे, बोक्यांचे घोटाळे ओपन करणार 

वैजापूर ,​५​ जानेवारी  / प्रतिनिधी :- मंगळसूत्र आमच्या नावाने घालायचे अन पैशासाठी संसार दूसऱ्या सोबत करायचा अश्या गद्दारांच्या विरोधात काही घोषणा दिल्या तरी त्यांना चालते परंतू ”बोके अन खोके” म्हणून कोणी हिनवले तर का चालत नाही. पैसेसाठी दुसऱ्या सोबत घरोबा केला. ठीक आहे पण तुमची कुंडली शिवसेनेकडे असून जसे मुख्यमंत्री शिंदे, सत्तार यांचे घोटाले समोर आणले तसे एक-एक बोक्यांचे घोटाले आम्ही लवकरच ‘ओपन’ करणार असल्याची टिका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर केली. बुधवारी (ता.04) शहरात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने वैजापूरचे माजी आमदार स्व. आर.एम.वाणी यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांचा मेळावा व कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा आयोजित केला होता. 

येथील सूरज लॉन्स येथे आयोजित या मेळावा व प्रवेश सोहळा कार्यक्रमात माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, जेष्ट नेते आसाराम पाटील रोठे, बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील निकम, जिल्हा परिषदेचेमाजी सभापती अविनाश पाटील गलांडे, महिला आघाडीच्या आनंदीबाई अन्नदाते, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी, प्रशांत शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दानवे म्हणाले, वाणी साहेब आता जर असते तर त्यांनी पक्षासोबत गद्दारी करणाऱ्याला बुटाने मारले असते. खरे शिवसेनिक आजही उध्दव ठाकरे सोबत आहेत. जे कार्यकर्ते शिंदे गटात गेले ते शिवसेनिक नसून पाच-दहा लाखांचे काम मिळवण्यासाठी हुजरेगिरी करणारे लाभार्थी आहे. ‘बोके अन खोके’ यांनी केलेले घोटाले ओपन करण्यासाठी विधानसभेत मी सक्षमपणे उभा असून तुम्ही गद्दाराना कसे लथाडता येईल तो प्रश्न तुमच्यावर सोडत असल्याच्या सूचना दानवे यांनी शिवसैनिकांना  बैठकीत दिल्या.

चिकटगावकरांचा हल्लाबोल

शहरात दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीची आढावा बैठक होती.या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चिकटगावकरांवर जोरदार टिका केली होती. त्यामुळे चिकटगावकर या टिकेचे कसे उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.अखेर मेळाव्यात माजी आमदार चिकटगावकर यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल करत ज्या लोकांच्या प्रवेशासाठी माझे सहा महिन्यापासून विरोध करत होता.त्यांना माझ्या पाठीमांगे कारस्थान करत पक्षात प्रवेश दिला. मी स्वताहूंन राष्ट्रवादी सोडली नाही मला त्यांनी पक्षातून काढले. आता जे माझ्यावर टिका करत आहे. त्यांना सांगतो कुत्रं भूकले नंतर हत्तीने कधी उत्तर दिले का अशी खोचक टिका त्यांनी यावेळी केली.