प्राध्यापकांचे सर्व प्रश्न सोडवून न्याय देण्यास शासन कटीबध्द- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

Displaying _DSC1955.JPG

औरंगाबाद,१२ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- प्राध्यापकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून सर्व घटकांना समान न्याय देण्यासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.

Displaying _DSC1936.JPG

            प्राध्यापक संघटने (बामुक्टा) तर्फे तर्द्थ प्राध्यापकांना पेन्शन मंजूर केल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा सत्कार सोहळा देवगिरी महाविद्यालयातील रवींद्रनाथ टागोर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्वश्री आमदार सतिश चव्हाण, विक्रम काळे, अंबादास दानवे, उच्च व तंत्र शिक्षण संचालक डॉ.धनराज माने, यशवंत शितोळे,प्राचार्य अशोक तेजनकर  यांच्यासह प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. यावेळी ‘करीअर कट्टा’ बॅनरचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

Displaying _DSC1943.JPG

            संघटनेने मांडलेल्या प्राध्यापकांच्या विविध मागण्या यामध्ये  प्राचार्यांची रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण अनुसार भरणे, विद्यापीठ कायद्याबाबत तज्ज्ञ व्यक्तींचे मत विचारात घेऊन फेरविचार करणे, प्राध्यापकांची रिक्त पदांची भरती, तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ, यासह इतर प्रश्नांबाबत सकामरात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर प्रश्न सोडविला जाईल, असे आश्वासन श्री.सावंत यांनी यावेळी दिले.