वंदे किसानच्या ‘सर्पदंश मुक्त महाराष्ट्र’ मोहीमेस प्रारंभ

सर्पदंशाबाबत जनजागृतीची गरज – आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई ,१२ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- दरवर्षी भारतात किमान ६०,००० शेतकऱ्यांचा सर्पदंशाने मृत्यू होतो. लाखो लोकांचे हात-पाय निकामी होतात. ह्या विषयाच गांभीर्य लक्षात घेऊन वंदे किसान व डॉ. सदानंद राऊत ह्यांच्या विघ्नहर मेडिकल फाउंडेशन तर्फे ‘सर्पदंश मुक्त महाराष्ट्र’ मोहीम हाती घेतली असून, ह्या मोहिमेचा शुभारंभ काल सह्याद्री अतिथीगृहात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे ह्यांच्या शुभहस्ते व राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ह्याच्या अध्यक्षतेखाली झाला 

. सर्पदंशाने होणारे मृत्यू कमी होण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सजग झाले पाहिजे व त्याचबरोबर सर्पदंशाबाबत जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत आरोग्य मंत्री राजेश टोपे व गृह मंत्री दिलीप वळसे पाटील व्यक्त केले.

वंदे किसान ह्या मोबाईल ॲप द्वारे ‘सर्पदंश मुक्त महाराष्ट्र’ मोहिमे अंतर्गत शेतकऱ्यां व विशेतः ग्रामीण युवकांना सर्पदंशाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, प्रथमोपचार करतायावे म्हणून शेतकरी, सर्पमित्र व डॉक्टरांसाठी तीन वेगवेगळ्या कोर्सेस चे अनावरण करण्यात आले. हे सर्व कोर्सेस सर्पदंश तज्ञ डॉ. सदानंद राऊत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली बनविले असून सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहेत. कोर्सेस पूर्ण करणाऱ्यांना  मोफत प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहेत. ह्या कोर्सेस मध्ये सर्प दंशाबद्दल जागरूकता, सापांची ओळख, प्रतिबंधात्मक उपाय, प्रथोमपचार, समज-गैरसमज, रुग्णाची वाहतूक ह्यासारखे अनेक मुद्दे शिकवले जातील. ह्या कोर्सेसला रजिस्टर करण्यासाठी इच्छुकांनी ८८७९ ७१२ ७२१ ह्या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन ॲप डाउनलोड करायचे आहे. ह्या कार्यक्रमाला अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, प्रधान सचिव डॉ. निलीमा करकेट्टा, आयसीएमआरच्या संचालिका डॉ. गीतांजली सचदेव, आयएमएचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे, डॉ. सदानंद राऊत, वंदे किसान चे संचालक शिवाजी फुलसुंदर, अनिरुद्ध हजारे, प्रसाद कुलकर्णी, संतोष किल्लेकर उपस्थित होते.