औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या यादीत पश्चिम मतदारसंघावर झालेल्या अन्याय : आमदार संजय शिरसाट

Displaying IMG_3146.JPG

औरंगाबाद,३१ऑक्टोबर /प्रतिनिधी:- आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते आज सातारा परिसरातील द्वारकादासनगर, अर्थव क्लासिक येथे सिमेंट रस्त्याचा लोकार्पण व अबरार कॉलनी येथे भूमिगत गटारीचे भूमिपूजन करण्यात आले.

या लोकार्पण प्रसंगी आमदार शिरसाट म्हणाले की, माझ्या पश्चिम विधानसभा मतदार हा मोठा प्रमाणात व्यापला आहे, त्यामुळे या भागाचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हळूहळू निधी राज्य शासनाकडून आणावा लागतो, त्यासाठी खूप कष्ट घ्यावे  लागतात. आपली इतकी मोठी महानगरपालिका असून देखील विकास कामे करू शकत नाही, या विकास कामे करायची असेल तर आमदार कुठून निधी आणणार ?, हारतुरे घेणे सोपे आहे, मागच्या वेळी राज्य शासनाने मनपाला 80 कोटींचा निधी दिला त्यावेळी माझ्या पश्चिम मतदार संघाच्या विकासासाठी फक्त अडीच कोटींचा निधी मनपाने दिला असा अन्याय का ? असा सवाल देखील आमदार शिरसाट यांनी उपस्थित केला.

ज्या सातारा देवळाई साठी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठक लावली, त्यावेळी साडे तीनशे कोटींचा निधी मंजूर झाला आहे तर जो निधी मंजूर झाला तो सगळा सातारा देवळाईसाठी वापरावा लागेल, या भागातील सर्व लोक मनपाचे सगळे कर भरत असताना मग त्यांना सोयीसुविधा का देत नाही? असा खडा सवाल आमदार संजय शिरसाट यांनी उपस्थित केला.

याप्रसंगी उपशहरप्रमुख रमेश बाहुले, माजी महापौर रशीदमामु, मुसा चाऊस, विभागप्रमुख रंजीत ढेपे, उपविभागप्रमुख मनोज सोनवणे. बाळु मिसाळ, संतोष जाटवे, शाखाप्रमुख ईश्वर सतीष पारखे, शेख मुनिर, महेश कदम, बाळु पारखे, आकाश डोईफोडे, विकास कुबेर, अशिष शिंदे, सुशील देशपांडे, विलास चंदने, महिला विजया शिंदे, सायली देशपांडे, रोहिणी पारखे, योगिता पारखे आदींची उपस्थिती होती