शिवसेनेच्या ध्वज दिवाळी अभियानाची अमरप्रीत चौक येथून आज सुरूवात

औरंगाबाद,३१ऑक्टोबर /प्रतिनिधी:- शिवसेना  यावर्षी  नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन दिवाळी अनोख्या पध्दतीने साजरी करणार आहे. औरंगाबाद  जिल्ह्यात (50,000) पन्नास हजार घरांवर भगवे ध्वज या  दिवाळीनिमित्त लावले जाणार आहे. या ध्वज दिवाळी अभियानाची मुख्य सुरूवात आज १ नोव्हेंबर  रोजी सकाळी 08.30 वाजता अमरप्रीत चौक येथून करण्यात येणार असल्याचे शिवसेना  जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी कळविले आहे.
 सकाळी ठीक 08.30 वा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पूजन करून या ठिकाणी भगवा ध्वज उभारुन ध्वज  दिवाळी अभियानाची मुख्य सुरूवात होणार. आहे. यावेळी शिवसेना नेते .चंद्रकांत खैरे , शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे,आमदार प्रदिप जैस्वाल , आमदार संजय शिरसाठ , माजी .महापौर,नंदकुमार घोडोले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .या कार्यक्रमास संघटनेचे पदाधिकारी, शिवसैनिक,नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे,उपजिल्हाप्रमुख जयवंत ओक ,अनिल पोलकर ,विनायक पांडे ,आनंद तांदुळवाडीकर, राजेंद्र राठोड ,संतोष जेजुरकर,शहरप्रमुख ,बाळासाहेब थोरात ,विजय वाघचौरे ,विश्वनाथ स्वामी ,बाबासाहेब डांगे, विधानसभा संघटक राजु वैद्य ,गोपाल कुलकर्णी ,सुशिल खेडकर महिला आघाडी संपर्क संघटक सुनीता आऊलवार , सहसंपर्क संघटक सुनीता देव , जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ,ऋषीकेश खैरे, जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे यांनी  केले आहे.
शहरात ठिकठिकाणी ध्वजारोहण 

या अभियानाअंतर्गत शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते आज 1 ऑक्टोबर रोजी फुलंब्री मतदार संघात त्याचप्रमाणे औरंगाबाद पूर्व शहरात* सकाळी 9:00 वा.पुंडलिक नगर , 9:30 वा.बाळकृष्णनगर  ,10:00 वा. जयभवानीनगर ,10:30 वा.ज्ञानेश्वर कॉलनी  , 11:00 वा. चिकलठाणा, 11:30 वा. नारेगाव ,दुपारी 12:00 वा.सिडको एन 6 दु. 12:30 वा. एन 8,  01:00 वा. आयोध्यानगर , 01:30 वा. संजयनगर याठिकाणी ध्वज दिवाळी  ध्वजारोहण  उपक्रमाची सुरुवात होणार आहे.