मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेतर्फे कोविड लसीकरण व जागृतीसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण

वैजापूर,१३ एप्रिल  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील मराठवाडा ग्रामीण विकाससंस्थेमार्फत कोविड 19 लसीकरण व जनजागृतीसाठी रुग्णवाहिकाचे लोकार्पण महानगरपालिका आयुक्त  आस्तिक कुमार पांडे यांच्याहस्ते बुधवारी झाले.

अतिरिक्त आयुक्त  बप्पासाहेब नेमाने, वैद्यकीय अधिकारी आरोग्य विभाग डॉ. पारस मंडलेचा, कोविड 19 लसीकरण नोडल ऑफिसर डॉ. प्रेरणा संकलेचा, मराठवाडा ग्रामीण विकाससंस्थेचे अध्यक्ष मनसुख झांबड, संस्थेचे सचिव व प्रकल्प संचालक आप्पासाहेब उगले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा झाला. 

मराठवाडा ग्रामीण विकास संस्था ही औरंगाबाद, बीड, नादेड,अहमदनगर तसेच नासिक जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात कार्यरत आहे. या रुग्णवाहिका लोकार्पण प्रसंगी एम.जी.व्ही.एस.चे टीम मेंबर अनुप मोरे, सचिन अंभोरे, श्रीमती अन्नपूर्णा, श्रीमती  झिया शेख, सुनिल उगले, सतीश नांगुर्डे आदी उपस्थित होते. मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेमार्फत औरंगाबाद महानगरपालिकाअंतर्गत कोविड लसीकरण तसेच जनजागृती करण्यात येणार आहेअशी माहिती संस्थेचे अध्यक्ष मनसुख झाम्बड यांनी दिली.