शनी देवगांव उच्चपातळी बंधारा : 160 कोटींचे अंदाजपत्रक तयार,लवकरच प्रशासकीय मान्यता मिळणार–आ. रमेश पाटील बोरणारे

वैजापूर ,२६ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-गेल्या दहा-बारा वर्षापासून प्रलंबित असलेल्या वैजापूर तालुक्यातील शनी देवगांव उच्च पातळी बंधाऱ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून, या संदर्भात आ.रमेश पाटील बोरणारे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह या प्रकल्पाच्या जागेची मंगळवारी प्राथमिक पाहणी केली.

Displaying IMG-20211026-WA0034.jpg


वैजापूर-श्रीरामपूर तालुक्यातील 15 ते 20 गावांतील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे.857 द.ल.घ.मी.पाणीसाठवण क्षमता या प्रकल्पाची आहे.160 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार झाले असून,हवामान खात्याचे नाहरकत प्रमाणपत्र व “स्ट्रॉम व्हॅल्यूज” प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या कामाची सुधारित मान्यता लवकरच मिळणार आहे. आ. बोरणारे यांनी आज जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.पाटोळे, सहाय्यक अभियंता श्री.गावंडे यांच्यासह या प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. यावेळी आ.बोरणारे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना या प्रकल्पाची माहिती देऊन हा प्रकल्प लवकरच पूर्ण व्हावा यासाठी पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगितले.जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, शिवसेनेचे उपतालुकप्रमुख सिताराम पाटील भराडे,युवासेनेचे प्रसाद पवार, विजय पवार,संभाजी सवई, गंगाराम बनसोडे,अशोक भराडे, जगन्नाथ भराडे,संजय मेघळे यांच्यासह या परिसरातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.