‘स्वारातीम’ विद्यापीठ रासेयो विभागाच्या वतीने रत्नेश्वरी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

नांदेड ,२६ऑक्टोबर /प्रतिनिधी :- भारत सरकारच्या पुणे येथील युवा कल्याण व खेळ मंत्रालय रासेयो क्षेत्रीय निदेशालय यांच्या निर्देशानुसार ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘स्वच्छ भारत’ अभियान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रत्नेश्वरी मंदिर, वडेपुरी ता. लोहा जिल्हा नांदेड येथे दि. २३ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आले. 

Displaying रासेयो (2).jpg

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड शहरातील राष्ट्रीय सेवा योजना राबविणाऱ्या यशवंत महाविद्यालय, सायन्स कॉलेज, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, प्रतिभा निकेतन महाविद्यालय, पीपल्स कॉलेज, ग्रामीण तंत्रनिकेतन कॉलेज, जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, वसंतराव नाईक महाविद्यालय, विद्यापीठ परिसर इत्यादी महाविद्यालयातील ८५ रासेयो स्वयंसेवक व १० रासेयो कार्यक्रम अधिकारी यांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान संपन्न झाले. या शिबिरात नवरात्र काळात रत्नेश्वरी देवी मंदिर परिसरात पसरलेले प्लास्टिक, द्रोण, पत्रावळी, ग्लास व इतर कचरा गोळा करून मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात आला. यावेळी अंदाजे पंचावन्न ते साठ किलो प्लास्टिक गोळा करून नष्ट करण्यात आले.   

या स्वच्छता अभियान प्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी भेट देऊन सहभागी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करून प्रेरित केले. या शिबिराचे आयोजन विद्यापीठाच्या रासेयो विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे यांच्या पुढाकारातून झाले होते. यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. ज्ञानोबा मुंढे, महिला महाविद्यालयाचे डॉ. भगवान गुंजलवाड, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. अरुणा शुक्ल, डॉ. बाबुराव जाधव, डॉ. डी. डी. भोसले, डॉ. सुनील कदम, डॉ. सुग्रीव फड, डॉ. ललिता यडपलवार, डॉ. साहेब शिंदे, डॉ. विजय मोरे, डॉ. अमोल काळे, प्रा. विजू जाधव तसेच रत्नेश्वरी देवी मंदिर संस्थानाचे अध्यक्ष शिवाजी दळवे, सचिव साहेब झांबरे, विश्वस्त सदाशिव स्वामी व इतर कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.