आरोपींना जलद शिक्षा होण्यासाठी पाठपुरावा करणार-उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

तोंडोळी येथील पिडीत महिलांची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली भेट

शासनाच्या मनोधैर्य योजनेतून मदत देणार

औरंगाबाद,२४ऑक्टोबर /प्रतिनिधी :- पैठण तालुक्यातील तोंडोळी येथील पिडीत महिलांची आज विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट घेऊन मनोधैर्य वाढवण्यासाठी संवाद साधला. यादरम्यान वैद्यकीय तपासणी, व जलदगतीने आर्थिक आणि इतर मदत मिळण्याकरिता जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले.

Displaying 2.jpg

            पैठण तालुक्यातील बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात भेटी दरम्यान दोन्ही पिडीत महिलांशी संवाद साधून घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेत पोलीस प्रशासनाला लवकरात-लवकर चार्ज शिट दाखल करण्याबरोबरच संशयितांना ताब्यात घेण्यासंबंधी सूचना केल्या. यादरम्यान डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, महिलांचे मनोधैर्य वाढविण्याबरोबरच त्याचे पुनर्वसन करण्यासाठी समुपदेशन आणि मानसिक धैर्य देण्याचे काम वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत केले जात आहे. याप्रकरणातील तपासणी व गोपनियता लक्षात घेवून संबंधीत पिडीत कुटुंबांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी राष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोगामार्फत पिडीत कुटुंबातील महिलांना मदत मिळण्यासाठी शासनामार्फत पाठपुरावा करणार येत आहे. आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळण्याकरीता कायदेविषयक मदत व मार्गदर्शन पिडीत कुटुंबियांना केले जाणार असल्याचेही यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

            दरोडा व बलात्कार या दोन्ही गुन्ह्याविषयी राज्यस्तरीय समितीमध्ये विशेष SOP तयार करण्याबाबत गृह विभागाला सूचना केल्या असून याचा उपयोग तत्काळ गुन्हे निकाली काढण्यासाठी मदत होणार आहे. मानवी तस्करी रोखण्यासाठी तसेच महिलांवरील अत्याचार थांबण्यसाठी शासन प्रयत्न करत असल्याचे यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.  यावेळी आमदार अंबादास दानवे, पोलीस उप अधिक्षक विशाल मेहूल,  बिडकीन येथील ग्रामीण रुग्णायाचे स्त्रीरोग तज्ञ डॉ. संजय गोरे, निवासी वैद्यकीय अधिक्षक डॉ. शारदा खरात, यांची यावेळी उपस्थिती होती.