उन्हाळी कांद्याची आवक घसरली; वैजापूर बाजार समितीत कांद्याला 2900 रुपये भाव

वैजापूर ,२३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याची आवक घसरली आहे.आज शनिवारी 1612.70 क्विंटल कांद्याची आवक झाली.आवक कमी असल्याने दरात सुधारणा दिसून आली. चांगल्या प्रतीच्या उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त 2 हजार 925 रुपये भाव मिळाला, तर कमी प्रतवारी असलेल्या कांद्याला 800 रुपये प्रमाणे भाव मिळाला.सरासरी 2 हजार ते 2 जार 500 रुपये भावाने कांदा खरेदी झाली.अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव व्ही.डी.सिनगर यांनी दिली.
यंदा कांद्याला चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकरी मोठ्या आशेने खरीप कांदा लागवडीकडे वळला.मात्र, खरिपाला दृष्ट लागली.अतिपावसामुळे काढणीस आलेला खरीप कांदा जमिनीतच सडल्यामुळे  शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.दरवर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान उन्हाळ कांद्याची आवक कमी होते तर लाल कांदा दिवाळीनंतर बाजारात येतो.या महिन्या – दीड महिन्यात कांदा टंचाई  निर्माण होत असल्याने दरात वाढ होते.