चिमुकलीवर अत्याचार,नराधमास कोठडी 

औरंगाबाद,१जून :
भुताचा धाक दाखवुन सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार  करणाऱ्या  नराधम आतिष ईश्र्वरसिंग लाहोट (३२) याच्या पोलिस कोठडीत ३ जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.जे. पाटंगणकर यांनी सोमवारी  दिले. आरोपीला गुरुवारी  सायंकाळी पोलिसांनी अटक केली होती.
या प्रकरणात सहा वर्षीय पिडितेच्या वडीलांनी तक्रार दिली.१७ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास
पीडिेतेचे वडील घरासमोर उभे असताना त्यांचा  मित्र  त्यांना भेटण्यासाठी आला. मित्राने सांगितले की, मी १५ एप्रिल रोजी सकाळी सहा साडे सहा वाजेच्या सुमारास इमारतीच्या बाल्कनीत  उभा असताना आरोपी आतिष हा पीडितेसोबत अश्लिल चाळे करताना दिसला. त्यामुळे त्याला जाब विचारला असता त्याने मला माफ करा यापुढे  असे काही करणार नाही असे म्हणाला.
सर्व हकीकत ऐकताच पीडितेच्या
वडिलांनी पीडितेला विश्र्वासात घेउन विचारपुस केली असता पिडितेने सांगितले की, काही दिवसांपासून आरोपी हा पीडितेला आपल्या घराच्या ओट्यापाशी घेवुन जात व भुताचा धाक दाखवून पीडितेवर अत्याचार करत , याबाबत कोणाला सांगितले तर तुझ्या वडिलांना मारुन टाकीन अशी धमकी आरोपी पीडितेला देत होता असे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान आरोपीला गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने एक जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपीच्या पोलिस कोठडीत ३ जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणात सहाय्यक लोकाभियोक्ता राजू पहाडीया यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *